भिवंडी : तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीची प्रचिती भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांना आली आहे. महापालिका प्रशासनाने कामगारांच्या बोनसच्या रकमेतून युनियनच्या नावाने परस्पर ५०० रूपये रकमेची कपात केल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.
भिवंडी महापालिकेत ३ हजार ८०० कामगार आस्थापनेवर असून या कामगारांना दिवाळी बोनस म्हणून प्रशासनाने ८ हजार १०० रु पये मंजूर केले आहेत. या अनुदान रकमेचे वाटप २४ आॅक्टोबर रोजी करण्यात आले. मात्र पालिकेने जाहीर केलेल्या बोनस रकमेतून ५०० रु पये कपात केल्याने कामगार बुचकळ््यात पडले आहेत. तर काहींनी पालिका आयुक्तांकडे त्यासंदर्भात लेखी निवेदन सादर करून कामगारांचे ५०० रु पये तात्काळ परत करावेत अशी मागणी केली आहे. महापालिकेत १२ कामगार संघटना कार्यरत आहेत. या कामगार संघटनांच्या कृती समितीने प्रशासनाला पत्राद्वारे ५०० रु पये कपात करून १७ लाख समितीकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे.संघटनेला अधिकार नाहीकामगारांच्या हक्काचे पैसे परस्पर कपात करून घेण्याचा अधिकार कोणत्याच कर्मचारी संघटनेला नसून तसा कायदाही नाही. मात्र भिवंडी शहर महापालिका प्रशासनाने कर्मचारी कृती समितीच्या संगनमताने पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेतून ५०० रु पये परस्पर कपात केले आहेत. प्रशासन व कामगार संघटनांची ही कृती कामगार विरोधी व अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रि या विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे यांनी दिली आहे.भविष्यासाठी वापरकामगारांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागतात. त्यासाठी नेहमीच आर्थिक अडचण निर्माण होते. कामगारांच्या सर्वच संघटना एकत्र येऊन एक कृती समिती नेमण्यात आली आहे. या कृती संघटनेत प्रत्येक कामगारांचे हे ५०० रु पये जमा होणार असून भविष्यात कामगारांच्या भल्यासाठी या रकमेचा वापर करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रि या लेबर फ्रंट कामगार युनियनचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी दिली आहे.पैसे परत करूदरम्यान, तक्रारदार पंकज गायकवाड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. याबाबत निवेदनही दिले आहे. दोन दिवसात पालिका कर्मचाºयांना त्यांच्या हक्काचे पैसे परत करू असे आश्वासन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिले आहे.