ठाणे: ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले. एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे आपापसात ठरवण्यात आले आहे. समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे काही नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप असून त्यासाठी महाविकास आघाडी आवश्यक आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची असल्याचे मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्नकारांशी बोलत होते.महाराष्ट्रात एकत्न येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करत भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवित आहेत. त्याच धर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन फार गरजेचे आहे. त्यामुळेच सर्वांनी एकमताने महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेची चर्चा करणार का, यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून आल्यानेच आम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीमध्ये मतभेद असतात. पण, ते बाजूला सारुन किमान समान कार्यक्रम करुन पुढे जावेच लागते. चर्चेला बसल्यावर अजेंडा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षातील नेत्यांनी सामंज्यस्याची भुमिकी घ्यावी लागते - एकनाथ शिंदे राज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे आम्ही आघाडीच्या बाजुने आहोत. आमच्याकडून सुरवातीपासून केव्हा टिकी केली गेली नव्हती. परंतु समोरुन जर टिका होत असेल तर त्याला प्रतिउत्तर हे द्यावेच लागते. त्यामुळे सर्वानी संभाळून बोलावे, आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षातील नेत्यांना सामंजस्याची भुमिका घ्यायला हवी अशा प्रतिक्रिया ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अखेर राष्ट्रवादीचं ठरलं! जितेंद्र आव्हाडांकडून मोठी घोषणा; भाजपचं टेन्शन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 5:20 PM