शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाण्यात 'माझं कुटुंब माझी जाहिरातबाजी'; जनतेच्या पैशांवर नगरसेविकांच्या पतीराजांची चमकोगिरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 5:31 PM

बॅनरवरील नातेवाईकांचे फोटो हटवा : मनसेसह सामाजिक संघटनांची मागणी  . ठाणे पालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडात असताना प्रभाग सुधारणा निधीचा बिनदिक्कतपणे अपव्यय सुरु असल्याची बाब समोर आली आहे.

लोकमत नव नेटवर्क ठाणे : आयजीच्या जीवावर बायजी हुशार, बायकोच्या पदावर नवरा सुभेदार ! अशी नवीनच म्हण सध्या ठाण्यात बोलली जात आहे. कारणही तसंच आहे. आरक्षणामुळे ज्यांना ज्यांना त्यांच्या पत्नींना निवडणुकीत उभे करावे लागले, त्या सर्व नगरसेविकांचे नवरोबा आपणच नगरसेवक असल्याच्या थाटात फिरताना दिसतात. इथपर्यंत ठीक होतं, मात्र आता जणू आपण या नगराचे मालक असल्याच्या थाटात नगराच्या प्रवेशद्वारावर जनतेच्या पैशावर बॅनरबाजी करण्याची नवी टूम ठाण्यात आली आहे.

  कोरोना काळात एकीकडे मुख्यमंत्री 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' अशी भावनिक साद घालत नागरिकांना आवाहन करत असताना ठाणे शहरातील त्यांच्या शिवसेनेच्या शिलेदारांनी 'माझं कुटुंब माझी जाहिरातबाजी' अशा उक्तीनुसार नातेवाईकांच्या फोटोची डिजिटल बॅनरवर छबी झळकवली आहे. प्रभाग क्रमांक पाच आणि सातमधील शिवसेना नगरसेविकांच्या पतीचे फोटो या डिजिटल बॅनरवर दिसत असून जनतेच्या कररूपी पैशांवर सुरु असलेली ही चमकेशगिरी तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह या भागातील सामाजिक संघटनांनी  केली आहे.

ठाणे पालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडात असताना प्रभाग सुधारणा निधीचा बिनदिक्कतपणे अपव्यय सुरु असल्याची बाब समोर आली आहे. प्रभाग क़्र. ५ मध्ये संस्कार पब्लिक शाळेजवळील शिवाईनगर नगरच्या स्वागताचा बोर्ड व प्रभाग क़्र ७ मध्ये वर्तकनगरात डिजिटल बोर्ड उभारण्यात आले आहेत. या फलकांवर वर्तकनगर येथे शिवसेना नगरसेविका राधिका फाटक यांचे पती राजेंद्र फाटक आणि शिवाईनगरात शिवसेनेच्या नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांचे पती भास्कर बैरीशेट्टी यांची छबी झळकली आहे. नगरसेविकेचे पती हे कोणत्याही प्रशासकीय हुद्यावर अथवा स्वत: नगरसेवक नाहीत. त्यांचा फाटो कोणत्या हेतुने लावला की यामागे निव्वळ राजकीय स्वार्थ आहे, असा प्रश्न मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर मनविसे उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका