शहरं
Join us  
Trending Stories
1
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
4
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
5
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
6
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
7
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
8
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
9
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
10
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
11
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
12
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
13
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
14
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
15
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
16
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
17
"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा
18
Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी
19
ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:46 AM

लहानपणी मी कधीही मैदानी खेळ खेळात रमले नाही. खेळाऐवजी पुस्तकांचे विपूल वाचन केले. वाचनांची आवड असल्याने मुलांनाही मी छोटी-छोटी चरित्र विकत आणून देत असत

डोंबिवली : लहानपणी मी कधीही मैदानी खेळ खेळात रमले नाही. खेळाऐवजी पुस्तकांचे विपूल वाचन केले. वाचनांची आवड असल्याने मुलांनाही मी छोटी-छोटी चरित्र विकत आणून देत असत. आत्मचरित्र आणि व्यक्ती चित्रण वाचायला मला खूप आवडत असे. कार्व्हर ही एक वृत्ती आहे. कार्व्हर वाचल्यावर तो मुलांना सांगितले पाहिजे, असे वाटले. त्यातूनच ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाले, अशी कबुली ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी दिली.श्री गणेश मंदिर संस्थान व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्यातर्फे ‘पर्यावरण कट्टा’ या अंतर्गत गवाणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी गणेश मंदिरात झाला. या वेळी गवाणकर म्हणाल्या, आजपर्यंत मला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. पण माझे बोलणे ऐकायला येणारा प्रेक्षक मला पुरस्कारांपेक्षा मोठा वाटतो. ज्यांच्याकडे काहीच नाही, त्याला शून्यातून जग निर्माण करायचे असते. ज्यांना आई-वडील नसतात त्यांना हे कर किंवा करू नको, हे कोण सांगणार.कोणतीही सबब त्यांना सांगता येत नाही. सध्या आईवडील सांगतात त्याप्रमाणे मुले शिक्षण घेतात. त्यातही त्यांना करिअरच्या मोजक्याच वाटा माहीत असतात. पण मुलांनी निवडलेल्या करिअरमध्ये काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करावा. निर्णय घ्यायला शिकावे. आपण ही गोष्ट कशासाठी शिकतो, हे प्रथम ठरवावे. तुमच्या आजूबाजूलाही एखादा कार्व्हर असू शकतो. त्यामुळे कोणाची ही टिंगल उडवू नका. गरजवंताला मदतीचा हात द्या, असा सल्ला ही त्यांनी दिला.दरम्यान, डोंबिवलीत झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांबरोबरच कट्याचे पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या मुलाखतीत गवाणकर यांनी प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.