शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अपघाताच्या तपासातून उलगडले खुनाचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 4:59 AM

ठाणे : पहाटे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकास कारने धडक दिल्याच्या गत महिन्यातील घटनेच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणे : पहाटे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकास कारने धडक दिल्याच्या गत महिन्यातील घटनेच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नसून अनैतिक संबंधांतून केलेला खून असल्याचा दावा कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.ठाण्यातील आझादनगरातील रामजी छत्रधारी शर्मा (४६) हे १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ब्रह्मांड येथील तुलसी हॉटेलसमोर फेरफटका मारत असताना पांढºया रंगाच्या एका कारने त्यांना धडक दिली. या अपघातात शर्मा गंभीर जखमी झाले. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नासीर कुळकर्णी हे या प्रकरणाचा तपास करत असताना रामजी शर्मा एक सलून चालवत असून त्यांचे एका महिलेशी संबंध होते, अशी माहिती समोर आली. अपघाताच्या वेळी ती महिलाही तिच्या पतीसोबत तिथेच पायी फिरत होती, अशी माहिती रामजीच्या चुलत भावाने पोलिसांना दिली होती. या त्रोटक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासचक्र फिरवले. घटनास्थळाहून पोलिसांनी रामजींना धडक देणाºया कारच्या डाव्या बाजूचा आरसा आणि फॉग लॅम्प हस्तगत केला.रामजींच्या चुलत भावाने ज्या महिलेवर संशय व्यक्त केला होता, त्या महिलेचा सीडीआर (कॉल डिटेल्स) पोलिसांनी तपासला. तिचे नळपाड्यातील जयप्रकाश मंगरू चौहान याच्याशी संबंध होते. ही महिला जयप्रकाश चौहानच्या नियमित संपर्कात होती. रामजी यांना कारने धडक दिल्यानंतर मोबाइल फोन बंद करून जयप्रकाश फरार झाल्याचेही पोलिसांना तपासामध्ये समजले. पोलिसांनी त्याची कार हस्तगत केली.

टॅग्स :Murderखून