मुरबाड : मुरबाड शहरात रस्त्यावर गाड्या उभ्या करणाऱ्या वाहनांवर नगरपंचायतीकडून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू आहे. यादरम्यान गुरुवारी खुद्द मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर यांच्या शासकीय गाडीला जॅमर लावून दंडात्मक कारवाई केली. मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यांनी ही कारवाई करण्यास भाग पाडले.मुरबाडच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर यांची गाडी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर उभी करण्यात आली होती. ही बाब मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यांना कळताच त्यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना या गाडीचा दंड वसूल करण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्या नावे दंडात्मक रकमेची पावती फाडण्यात आली.मुरबाड नगरपंचायतीने रस्त्यालगत पार्क केलेल्या वाहनधारकांकडून २०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून नागरिक तसेच कर्मचारी यांच्यात सतत वाद सुरू असतात. त्यामुळे याबाबत लवकरच काही ठराव केले जातील, असे नगराध्यक्षा तोंडलीकर यांनी सांगितले. अशी दंडात्मक कारवाई करण्यासाठी एक समिती असते. तरीही, कुठलीही समिती गठीत न करता मनमानी पद्धतीने ही कारवाई होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दंडाची रक्कम जास्तया कारवाईसाठी घेतला जाणारा २०० रुपये दंड जास्त असल्याची तक्र ार नागरिक करत आहेत. नगरपंचायतीने जी जागा पार्र्किं गसाठी दिली आहे, त्या जागेत कोणतीही सुविधा नसून चिखलाचे साम्राज्य आहे. नागरिक नगरपंचायतविरोधी आंदोलन छेडतील, अशी चर्चा आहे.
नगराध्यक्षांच्याच गाडीला नगरपंचायतीचा जॅमर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:07 PM