शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

निवडणुकीपुरती वचने देत नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:58 PM

निवडणुकीच्या वेळी काही लोक येतात आणि आम्ही हे करू, आम्ही ते करू , असे सांगून जातात. परंतु, करत काहीच नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

ठाणे : निवडणुकीच्या वेळी काही लोक येतात आणि आम्ही हे करू, आम्ही ते करू , असे सांगून जातात. परंतु, करत काहीच नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता लगावला. शिवसेनाच निवडणुकीतील वचनपूर्ती करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्टिक सेंटर, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, ठाण्याचे भूषण ठरणारे अतिशय देखणे असे ग्रॅण्ड सेंट्रल पार्क यांचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. तसेच पोखरण रोड क्र .-२ येथील कम्युनिटी पार्कचे लोकार्पण आणि वेबपोर्टलचा शुभारंभही झाला. दरम्यान, सेंट्रल पार्क येथील भाषणात ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. राजकारणात युती होते आणि तुटते, पण ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात जे मनोमिलन आणि युती झालेली आहे, ती दीर्घकाळ अबाधित राहावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ठाण्यात चांगले काम करणा-या आयुक्तांची जशी परंपरा आहे, तशीच आयुक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाºया लोकप्रतिनिधींची देखील आहे, असे नमूद करून चांगल्या कामासाठी शिवसेना प्रशासनाच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभी राहिली आहे आणि भविष्यातही राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ठाणेकरांनी सातत्याने शिवसेनेचा भगवा आपल्या हातात घेतला आहे. मुंबई ही माझी आहे आणि ठाणेही माझेच आहे. दोन्ही ठिकाणच्या लोकांचे प्रेम माझ्यावर सारखेच आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे मुंबईपेक्षा पुढे गेले तर त्यात मला आनंदच वाटेल, असेही ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या काळात मी तुमच्याकडे हक्काने मते मागितली आणि ठाणेकरांनीही त्याच विश्वासाने मते दिल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.