दरवर्षी पावसाळ्यात बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. बदलापुरातील हेंद्रेपाडा, रमेशवाडी या भागात दरवर्षी पावसाचे पाणी साचत असते. तरीही या भागातील नाल्यांची सफाई करण्याकडे कंत्राटदार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा राजेंद्र घोरपडे यांचा आरोप आहे. दरवर्षी बदलापूर पालिका प्रशासन नालेसफाईच्या नावाने लाखो रुपये ठेकेदाराच्या घशात घालते. मात्र, प्रत्यक्षात नालेसफाई होतच नाही. नालेसफाईच्या नावाखाली केवळ थुकपट्टीचे उद्योग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने तहान लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी वेळीच याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील अनेक नाले आजही तुंबलेल्या अवस्थेत आहेत. त्यांची योग्य स्वच्छता करणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात नालेसफाई होतच नसून, केवळ नालेसफाईचा दिखावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
-----------------------------------------