शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

नालेसफाईच्या कामात नगरसेवकांना ‘पाकिटे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:44 PM

मोरे यांचा आरोप : चौकशीची मागणी

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील नालेसफाईचे पितळ पहिल्याच पावसात उघड झाले. यावर संतप्त झालेले शिवसेनेचे कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक व माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी नालेसफाईच्या कामात नगरसेवकांना दहा हजारांची पाकिटे वाटण्यात आल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले असून विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी मोरे यांच्या आरोपाची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे.

मोरे यांचा आरोप गंभीर आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या सदस्यांसह प्रशासनातील अधिकारी यांच्यात या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून याची चौकशी करावी. नगरसेवकांनी पाकिटे कधी आणि कोणी वाटली याचा छडा लागला पाहिजे. त्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. मोरे यांनी या वक्तव्याचे तातडीने खंडन करावे. कारण, मनसेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांच्या नालेसफाईच्या पाकीटवाटपाशी काहीही संबंध नाही. मोरे यांच्या वक्तव्यामुळे मनसेच्या नगरसेवकांकडे चुकीच्या नजरेने पाहिले जात आहे. नालेसफाई झाली नाही, या मोरे यांच्या आरोपात तथ्य आहे.मात्र नालेसफाई झालेली नसताना ती केली असून त्याविषयी नगरसेवकांनी मौन बाळगावे याकरिता त्यांना दहा हजारांची पाकिटे दिली गेली असल्याच्या आरोपात किती तथ्य आहे? नालेसफाई योग्य प्रकारे करण्यासाठी मनसेकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण