ठाणे : सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना हे युनिटचे कार्य मुंबई विद्यापीठात आदर्शवत ठरले. तसेच हे युनिट ठाणे शहराच्या जढणघडणीत वर्षानुवर्षे सहभागी आहे. या युनिटची स्थापना करणाऱ्या प्रा. बाळासाहेब खोल्लम यांच्या स्मरणार्थ शहरात एखाद्या चौकाला " प्रा. बाळासाहेब खोल्लम एनएसएस चौक" असे नाव द्या, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.
प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम श्रद्धांजली सभा दादा कोंडके अँम्पी थिअटरमध्ये पार पडली. या सभेला माजी महापौर आणि खोल्लम सरांचे विद्यार्थी नरेश मस्के, कविवर्य अशोक बागवे, प्रा. डाँ. प्रदिप ढवळ, कवी बाळ कांदळकर, प्रा. भारती जोशी, अजित उमराणी, सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष कमलेश प्रधान, प्राचार्य डाँ. गणेश भगूरे, कवी विनोद पितळे, अँड.संतोष आंग्रे, शिवसेना शाखा प्रमुख रमेश सांडभोर, दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू यांच्यासह खोल्लम यांचे कुटुंबीय, विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. तर त्यांचा मुलगा राहुल, सुनबाई रोहिणी, पुत्नी रागिणी यांच्यासह अन्य नातेवाईकही यावेळी उपस्थित होते.
खोल्लम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किंवा परत एकदा आठवणीना उजाळा देण्यासाठी जमलेले त्यांचे विद्यार्थी, सहकारी त्यांचे कुटुंबीय, मो.ह.विद्यालयातील सहकारी या सर्वांच्या आठवणीतून उलगडत गेले.आणि एक वेगळे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आले. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा. ते रागीट होते, पण त्याच वेळेला त्यांचा प्रेमळ, हळवा स्वभाव सहज प्रगट झाला. या सर्व अनुभवातून एक शिक्षक म्हणून सरांचा प्रवास जसा आठवला त्यापेक्षा एनएसएस स्वतः मुरवून घेतलेले प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. प्रा. खोल्लम हे प्राध्यापक नव्हे तर ते हाडाचे शिक्षक होते, अशा शब्दात प्रा. अशोक बागवे यांनी त्यांचे वर्णन केले. त्यांना आपल्या संस्थेबद्दल आदर प्रेम आणि आस्था पराकोटीची होती त्यामुळेच कधी त्यांनी आपल्या.
संस्थेबद्दल गैरशब्द खपवून घेतला नाही. कडवट शिस्तीच्या माणसाने एक आदर्शवत काम उभे केले. त्यांचे अनेक किस्से यावेळी प्रा. अशोक बागवे यांनी सांगितले तर नरेश मस्के यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देताना आपण आज जे नेता म्हणून नावा रुपाला आलो त्याचे सर्वश्रेय प्रा. खोल्लम यांनाच द्यावे लागेल असे नमूद केले. राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना प्रा. खोल्लम यांनी ज्यावेळी ज्ञानसाधना महाविद्यालयात केली त्यावेळी कसे खडतर परिस्थिती होती हे सुध्दा नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा.योजनेचा कँम्प हा एक आदर्श उपक्रम ठरला त्या कँम्पच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.तर प्रा. प्रदिप ढवळ, प्रा. भारती जोशी यांनी सहप्राध्यापक म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर कवी बाळ कांदळकर यांनी मित्र या नात्याने प्रा. खोल्लम यांच्या आठवणी जाग्या केल्या. आनंद विश्व गुरुकुल तर्फे प्राचार्य हर्षदा लिखिते यांनी श्रध्दांजली वाहिली तर मोह विद्यालयातर्फे ही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तर विद्यार्थ्यांनतर्फे कला दिग्दर्शक डॉल्फी फर्नाडिस यांने आठवणी सांगितल्या. तर पत्रकार प्रशांत डिंगणकर याने खोल्लम सर आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांचे ठाणे शहराचे नाते कसे होते हे सांगताना शहराच्या जढणघडणीत यांचा सहभाग होता हे विषद केले. त्यामुळे या शहरातील एका चौकाला प्रा. बाळासाहेब खोल्लम स्मृती एन एस एस चौक असे नाव देऊन त्यांच्या. स्मृती जतन कराव्या अशी सूचना केली. याबाबतचे लेखी निवेदन स्वाक्षऱ्यांसह नरेश म्हस्के यांना देण्यात आले आहे.