शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी देणा-याचे नाव मात्र गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 7:27 PM

दरोडे टाकून रोकड लुटणा-या सहा दरोडेखोरांनी तीन्ही दरोडयांची कबूली दिली आहे. दरोडयासह भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्याही हत्येची ५० लाखांमध्ये सुपारी घेतल्याची माहिती त्यांनी दिल्याने पोलीसही अवाक झाले.

ठळक मुद्दे‘त्या’ दरोडेखोरांनी दिली वाडयातील दरोड्याची कबुलीगोळीबार करुन तीन दरोडे टाकलेआणखी सहा साथीदारांचा शोध सुरु

ठाणे : भिवंडी परिसरातून अटक केलेल्या कैलास घोडविंदे याच्यासह सहा दरोडेखोरांनी वाडयात एका व्यापा-याच्या पायावर गोळीबार करुन सहा लाख ३० हजारांची रोकड लुटली होती. अशा तीन गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. दरम्यान, भाजपा नगरसेवक कुणाल पाटील यांची ५० लाखांची सुपारी देणा-या नगरसेवकाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, कैलास घोडविंदे, विजय मेनबन्सी, कासीम अन्सारी आणि दिलीप कनोजिया यांची धरपकड केल्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक गंभीर गुन्हयांची कबुली ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्यांच्या आणखी सहा साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. दरोड्याच्या तपासातच त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली ती म्हणजे कल्याण डोंबिवलीचे भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना भाजपच्याच एका नगरसेवकाने ठार मारण्याची दिलेली सुपारी. त्या नगरसेवकाने ५० लाखांपैकी १० लाख रुपये आगाऊ दिले होते. पण, कुणाल घराबाहेर न पडल्यामुळे मारेकºयांचा डाव फिस्कटला. दरोडेखोरांनी ज्याचे नाव घेतले त्या नगरसेवकाची माहिती, त्यांचे आणि कुणाल यांच्यातले संबंध तसेच त्यांचे कोणा कोणाशी वैमनस्य आहे. याशिवाय, इतर माहिती गोळा करण्यात येत आहे. ज्याने माहिती दिली तो विजय मेनबन्सी तसेच संबंधित नगरसेवकाचे कॉल रेकॉर्डसह इतरही तपशीलाची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतरच यातील अधिकृत जबाबदार शिक्कामोर्तब होऊ शकेल, असे ठाणे ग्रामीणच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.अटकेतील या सहा जणांच्या टोळीने २२ जुलै २०१७ रोजी भिवंडीजवळील अंबाडी येथील ‘डायमंड वाईन्स’ च्या मालकाच्या वाहनाला मोटरसायकल आडवी लावून लुटले होते. त्यावेळी त्यांनी तिघांवर गोळीबार केला होता. यात एकाच्या जबड्यातून, दुसºयाच्या हातातून गोळी निसटली होती. तर तिसºयाच्या खांद्याला गोळी लागली होती. यावेळी त्यांनी पाच लाखांची रोकड लुटली होती. तर २२ आॅक्टोंबर २०१७ रोजी अंबाडीतील ‘पूजा ट्रेडर्स’च्या मालकावर गोळीबार करून एक लाखांची रोकड लुटली होती. तसेच वाडा येथील व्यापाºयाच्या पायावर गोळीबार करून त्यांनी सहा लाख ३० हजारांची रोकडही लुटल्याची कबुली दिली. या तीन दरोड्यांसह त्यांनी कुणाल यांच्या हत्येचीही सुपारी घेतली. पण ते यातून बचावले. या टोळीकडून तीन लाख ४० हजारांच्या रोकडसह चार रिव्हॉल्व्हर आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.गय केली जाणार नाहीकुणाल यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाºयाचे नाव पुढे आले तरी त्याबाबत खातरजमा झाली तर कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला जाईल, पोलीस यंत्रणा कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा