शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
4
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
5
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
6
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
7
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
8
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
9
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
10
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
11
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
12
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
13
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
14
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
15
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
16
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
17
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
18
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
19
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
20
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

मेट्रो स्थानकासाठी नावे निश्चित, विरोधक अल्पमतात; सत्ताधाºयांची सूचना मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 1:49 AM

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले. यावेळी सेना व काँग्रेसने परिचित असलेली नावेच मेट्रो स्थानकांना देण्याचा ठराव मांडला असता तो अल्पमतात गेला.एमएमआरडीने निश्चित केलेल्या परिसरातील स्थानकांची नावे सुचवण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला होता. त्या अनुषंगाने भाजपाचे सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी राष्टÑीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वरील दहिसर चेकनाकाजवळच्या पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल परिसरातील नियोजित स्थानकांना अनुक्रमे पेणकरपाडा व मीरागाव, भार्इंदर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावरील काशिमिरा वाहतूक बेटाजवळच्या झंकार कंपनी येथील स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज, मीरा रोड येथील साईबाबा नगरपरिसरातील स्थानकाला सरदार वल्लभभाई पटेल, दीपक हॉस्पिटल येथील स्थानकाला नानासाहेब धर्माधिकारी, गोल्डन नेस्ट या छेदमार्गावरील क्रीडा संकुल परिसरातील स्थानकाला महाराणा प्रताप सिंह व इंद्रलोक येथील स्थानकाला नवघर, भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉल परिसरातील स्थानकाला महावीर स्वामी व नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसरातील स्थानकाला सदानंद महाराज अशी नावे देण्याचा ठराव मांडला.तसेच शहरात जी १८ महसूली गावे आहेत त्यांची नावेही स्थानकांना देण्याची सूचना केली. परंतु, महापौरांनी त्यांची मागणी अमान्य करत दोन्ही बाजूच्या सदस्यांना ठराव मांडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सत्ताधाºयांच्या बाजूने रोहिदास पाटील तर विरोधकांच्या बाजूने काँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी ठराव मांडला.जुबेर यांच्या ठरावाला सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी अनुमोदन दिले. त्यात साईबाबा नगर परिसरातील स्थानकाला सरदार पटेल ऐवजी ब्रह्मदेव मंदिर, क्रीडा संकुल परिसरातील स्थानकाला गोडदेव, मॅक्सस मॉल येथील स्थानकाला महावीर स्वामी ऐवजी शहीद भगत सिंग या नावांचा समावेश करण्यात आला. या वेळी घेतलेल्या मतदानात अखेर पाटील यांचा ठराव बहुमताने मंजूर झाला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMetroमेट्रो