कल्याण- भ्रष्टाचाराला ठेचून काढले पाहिजे या नाना पाटेकर यांच्या वक्तव्याचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी समर्थन केले आहे. याच वेळी त्यांनी उल्हासनगर महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदि कारभाराकडे लक्ष वेधत सडेतोड तोड टीका केली.
उल्हासनगर महापालिकेत अनधिकृत बांधकामे, पाणी चोरी, महापालिके क्षेत्रातील होर्डिंगच्या टॅक्सचे पैसे लाटणे, एकाच विकास कामांसाठी चार चार जागांचे निधी वापरणे असा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.नाना पाटेकर यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना आमदार गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेच्या कार्यपद्धतीला लक्ष्य केले आहे.
उल्हासनगर महापालिकेत सर्व अधिकारी वर्गाच्या हाताची पाचही बोटेसारखी आहेत. एकच कामासाठी आमदार निधी खासदार निधी महापालिकेच्या निधी राज्य शासनाचा निधी, असे चार निधी वापरले आहेत. अनधिकृत बांधकामांचा भ्रष्टाचार, पाणी चोरून विकणे, मेन लाईन वरून अनधिकृत कनेक्शन देऊन त्यांच्याकडून पैसे वसुली करणे, महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेला होर्डिंगचे पैसे खाल्ले जातात, याबद्दल माहिती मागितली तर माहिती दिली जात नाही. नाना पाटेकर यांनी जे सांगितले हे महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी नाना नाना पाटेकर यांचा आदर करतो आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याला दुजोरा देतो. जो भ्रष्टाचार होतोय तो भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे असे आमदार गायकवाड यांनी सांगितले.