ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेच्या रौप्य महोत्सवी वषार्निमित्ताने संस्थेच्यावतीने कथा-काव्य कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी कथा स्पर्धेत शीला हिरुरकर यांच्या ‘गिफ्ट’ या कथेला तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे यांच्या ‘कोण म्हणतो’ या कवितेने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी संस्थेच्या सभागृहात पार पडला. ९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी यावेळी डॉ. अनंत देशमुख, दा.कृ. सोमण, संजीव ब्रह्मे, विद्याधर ठाणेकर, विद्याधर वालावलकर आदी उपस्थित होते. कथा स्पर्धेत ६८ स्पर्धकांनी भाग घेतला होता तर काव्य स्पर्धेत १०० स्पर्धकांनी २८३ कविता पाठविण्यात आल्या होत्या. कथा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक वसुंधरा घाणेकर यांच्या मॅग्निफाइंग ग्लास या कथेला मिळाले. तृतीय पारितोषिक स्वाती पाटील यांच्या ‘एक कप चहा’ व ऋषीकेश वांगीकर यांच्या ‘सोयरीक’ या कथांना विभागून देण्यात आले. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक जयंत घेगडमल यांच्या ‘एका मयताची गोष्ट’, उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक मनीषा पोतनीस यांच्या ‘टर्निंग पॉईंट’ तर उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक शिरीष नाडकर्णी यांच्या ‘परिवर्तन’ या कथेला प्राप्त झाले. या स्पर्धेचे परिक्षण माधवी घारपुरे, शशिकांत कोनकर व अरविंद दोडे यांनी केले. कविता स्पर्धेत द्वितीय पारितोषिक संजीव फडके यांच्या ‘मंदिर आणि कुटी’ तर तृतीय पारितोषिक विलास वेखंडे यांच्या ‘वणवा’ या कवितांना मिळाले. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक वैशाली फाटक - काटकर यांच्या ‘एक प्रश्न’ तर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक रविंद्र सोनावणी यांच्या ‘निसर्ग कविता’ या कवितांना पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचे परिक्षण अरुण म्हात्रे, अनुपमा उजगरे, वृषाली कांबळे, सतीश सोळांकुरकर यांनी केले. या परिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन चांगदेव काळे यांनी केले.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आयोजित कथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:30 PM
मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आयोजित कथा - काव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून त्यांनी लिहिलेल्या कथा - काव्य मागविण्यात आले होते. रविवारी उत्कृष्ट कथा - काव्याना पारितोषिक देण्यात आले.
ठळक मुद्देकथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथमस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते कथा स्पर्धेत ६८ स्पर्धक, तर काव्य स्पर्धेत १०० स्पर्धक सहभागी