शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नरेंद्र मेहता आउट, रवींद्र चव्हाण इन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 1:22 AM

मेहता, चव्हाणांच्या तसबिरी लावणा-या पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या तसबिरी मात्र दालनात लावलेल्या नाहीत.

भाईंदर : वादग्रस्त व्हिडीओ क्लिपनंतर बलात्कार व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या तसबिरी महापालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या दालनातून काढून टाकण्यात आल्या आहेत. तर, मेहतांच्या तसबिरींची जागा आता प्रभारी तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. मेहतांच्या पालिकेतील तसबिरींवरून तक्रारी झाल्या होत्या. मेहता, चव्हाणांच्या तसबिरी लावणा-या पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या तसबिरी मात्र दालनात लावलेल्या नाहीत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असलेल्या मेहतांचा विधानसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरकरांनी पराभव केला. आमदार नसतानाही भाजपच्या पदाधिकाºयांनी दालनांमध्ये मेहतांच्या तसबिरी लावल्या होत्या. या पदाधिकाºयांनी महापुरुषांच्या तसबिरी सन्मानाने लावण्याऐवजी मेहतांच्या तसबिरी लावल्या होत्या.दरम्यान, आधीच काहीशी कुणकुण लागल्याने मेहतांनी पक्ष व राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले. मात्र, दोन दिवसांनी त्यांचा भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांसह नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांसोबतचा फोटो आला. महत्त्वाचे म्हणजे भाजपने अजूनही मेहतांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केलेले नाही. त्यामुळे नेते मेहतांसोबत असल्याचे मानले जाते.शिवसेना, कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेऊन महापौर आदी पदाधिकाºयांच्या पालिकेतील दालनात लावलेल्या मेहतांच्या तसबिरी काढण्याची मागणी केली. पदाधिकाºयांवर कारवाई करा, असे सांगितले. महापुरुषांच्या तसबिरी न लावणाºया भाजप पदाधिकाºयांसाठी वादग्रस्त असलेले मेहता हे आदर्शच नव्हे, तर राजकीय मायबाप असल्याची टीका काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी केली. सचिवांची ही जबाबदारी असून ते गैरकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला होता. मेहतांच्या क्लिप, बलात्काराचा गुन्हा आदी प्रकारांमुळे आधीच कोंडी झालेल्या भाजपला पालिका दालनातून मेहतांच्या तसबिरी काढाव्या लागल्या. आता मेहतांच्या तसबिरींची जागा भाजपचे प्रभारी चव्हाण यांनी घेतली आहे.>भाजपच्या जाहिरातींवर मेहताच नेतेमहापालिका मुख्यालयातील मेहतांच्या तसबिरी काढण्यात आल्या असल्या, तरी शहरात लावण्यात आलेल्या भाजपच्या जाहिरातींवर मात्र स्थानिक नेते म्हणून मेहताच आहेत. शिवाय, सोशल मीडियावरही अनेक भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांकडून मेहताच नेते असल्याचे दाखवले जात आहे.