- पंकज रोडेकरठाणे - मकरसंक्रांत आल्यावर लहानांपासून थोरांना वेध लागतात, ते पतंगांचे. ठाणे मुख्य बाजारपेठेत नवीन वर्षाच्या १ तारखेलाच पतंग दाखल आहे. विविध आकारांच्या पतंगांमध्ये यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बाहुबली-२ तसेच टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणारे प्रत्येक कार्टुन असलेल्या पतंगाची क्रेझ पाहण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा हाताच्या बोटाएवढ्या आकाराची फिरकीही दुकानात सर्वांचे लक्ष वेधत आहे. साधारणत: २० ते २५ दिवस चालणाºया या व्यवसायात एखादा दुकानदार सुमारे ६० ते ६५ हजार रुपयांच्या पतंगांचा व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते.ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत होलसेल पतंगविक्रीची अवघी दोनच दुकाने आहेत. ते सिझननुसार आपली दुकाने थाटतात. सध्या हा व्यवसाय मेमन कु टुंबातील तिसरी पिढी करताना दिसत आहे. यातील अबू मेमन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आजोबांसोबत दुकानात येत होतो. तेव्हा दोन रुपयांना पतंग असे. आता किंमत १० रुपये झाली असून सध्या सर्वाधिक महाग पतंग १२० रुपयांना विकत आहे. तसेच मेटल पेपर आणि कागद अशा दोन प्रकारांत ते उपलब्ध असून गुजरात राज्यातून ते येतात. त्यानुसार, १ जानेवारीलाच पतंग ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर, त्यांची विक्री साधारणत: २०-२५ दिवस सुरू राहते. हा व्यवसाय आता तसा त्रासदायक झाला आहे. यात फार असा नफा मिळत नाही. पण, पिढ्यान्पिढ्या तो सुरू असल्याने आवडीने करतो, असे मेमन यांनी सांगितले. गतवर्षाप्रमाणे यंदाही मोदी-योगी यांचे छायाचित्र तसेच बाहुबली-२ आणि सुपरमॅन, छोटा भीम तसेच लहानांना आवडणाºया सर्वच प्रकारच्या कार्टुनचे छायाचित्र असलेल्या पतंगांची मागणी अधिक आहे. त्यातच, यंदा मधोमध दोन काट्यांचे पतंग त्यातच नवीन असल्याचे त्यांनी सांगितले.फिरक्यांचा आकार बदललाफिरक्यांचा आकार बदलू लागला आहे. यामध्ये हाताच्या बोटाएवढ्या आकाराची फिरकी सर्वांचे लक्ष वेधत आहे. तसेच त्या फिरकीपेक्षा आणखी दोन आकारांच्या फिरक्या बाजारात दिसत आहेत. बोटाएवढी असलेली फिरकी की-चेन म्हणून वापरता येऊ शकते, असे ते म्हणाले.चायना मांज्याचीमागणी घसरलीयंदा चायना पतंग नसल्या तरी चायना मांजा बाजारात आला आहे. त्यालाही फारशी मागणी नाही. तो मागणीनुसार मिळावा, यासाठी उपलब्ध आहे. मात्र, त्याला मागणी नाही.मोदी- के युग मेंयोगी का राज!यंदाही मोदी-योगी या दोघांची छायाचित्रे असलेले पतंग बाजारात ठळकपणे पाहण्यास मिळत आहेत. त्यांच्या छायाचित्रांखाली ‘मोदी के युग में योगी का राज’ असे म्हटले आहे. तसेच त्याच्यावर कमळाचे चित्रही आहे.
नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, बाहुबलीची क्रेझ , हाताच्या बोटाएवढी फिरकी वेधतेय लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:46 AM