मीरा रोड : खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेत आले. चार वर्षांत शेतकरी, तरुण, कामगार, लहान व्यापारी देशोधडीला लागले. देश अधोगतीला नेण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जे पक्ष सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घेताना निष्ठावंतांचे मत विचारात घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मीरा-भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांचा मेळावा बुधवारी रात्री मीरा रोड येथे झाला. यावेळी अनेकांनी आपले अनुभव मांडतानाच कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची भावना व्यक्त केली. माजी मंत्री गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले, कार्याध्यक्ष संतोष पेंडुरकर आदी उपस्थित होते. ज्यांच्या हातात पक्ष दिला, ज्यांनी पदे उपभोगली, ते पक्ष सोडून गेले. पक्ष हा नागरिकांचा विकास व त्यांचे महत्त्वाचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे जात असतो. कार्यकर्त्यांच्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी बुथ कमिट्या स्थापन केल्या जात असून आतापर्यंत ५० हजार कार्यकर्त्यांनी नोंद केली आहे.भाजपा आता काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना महामंडळे देत आहे. जे आमचे राहिले नाहीत, ते तुमचे कसे राहणार.काहींना शून्यातून उभे केले, ते पण राहिले नाहीत. तालुका, जिल्हा कमिटी शिफारस करेल, त्यांना पदे देऊ, असे ते म्हणाले.चौकीदार प्रामाणिक नाही म्हणून ‘ते’ पळालेच्नागरिक १५ लाख कधी मिळतील, याची वाट पाहत आहेत. चौकीदार प्रामाणिक असता तर मल्ल्या, मोदी, चोक्सी यासारखे पैसे घेऊन पळाले कसे? नोटाबंदीमुळे मजूर, कामगार देशोधडीला लागले.च्एफडीएमध्ये १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला मोकळीक दिल्याने छोटी दुकाने बंद होण्याची सुरुवात हैदराबादमधून झाली आहे. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. नोटाबंदीनंतर होता तोही रोजगार गेला, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली.अंबरनाथमध्ये घेतली पदाधिकाऱ्यांची शाळाअंबरनाथ : तू विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहेस, मग कोणत्या तरी महाविद्यालयात प्रवेश घे. जा आता लाग कामाला. तुम्ही अध्यक्ष असूनही काम का करत नाही... साहेब, मला डायबिटीज आहे... डायबिटीज आहे, मग उपाध्यक्ष होऊन दुसºयाला संधी द्या... हा कोणत्याही स्थानिक पक्षाच्या बैठकीतला संवाद नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यातील आहे. अंबरनाथच्या रोटरी सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी काँंग्रेस मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक विभागाच्या अध्यक्षांची शाळा घेतली. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या जिल्हा मेळाव्यात पक्षातील फूट प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली. मात्र, जे गेले त्यांना श्रद्धांजली वाहून पक्षबांधणीच्या कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.प्रत्येक सदस्याला मंचावर बोलावून कामाचा आढावा देण्याचे पाटील यांनी सुचवले. त्यावेळी त्यांना काही प्रश्नही विचारले. काहींची अध्यक्षांनी खरडपट्टीही काढली. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला तू कोणत्या महाविद्यालयात शिकतो, हे विचारताच त्याची बोबडीच वळली. महाविद्यालयात जात नसशील, तर मग कोणत्या तरी कॉलेजात किंवा बाह्यविद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन टाक, असा खोचक सल्लाही त्याला पाटील यांनी दिला.ओबीसी विभागाच्या अध्यक्षाला तुम्ही वर्षभरापासून काम का करत नाही, असा सवाल विचारल्यानंतर... साहेब, मला डायबिटीज आहे, असे उत्तर त्या अध्यक्षाने देताच सभागृहात हशा पिकला. तुम्हाला डायबिटीज असेल, तर दुसºयांना संधी द्या, तुम्ही उपाध्यक्ष व्हा, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या भाषणात बोलतानाही त्यांनी दिवसातून दोनवेळा जेवा, इतर वेळी फक्त पक्षाचे काम करा. डायबिटीज कमी होईल, वाढला तर मला फोन करा, असेही पाटील म्हणाले.एका तालुकाध्यक्षाने थेट आमदार किसन कथोरे यांच्या धाकाने अनेक जण पद घेत नसल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली. त्यावर बोलताना आता कथोरे पॅटर्न नको, नवे नेतृत्व तयार करा आणि पक्ष वाढवा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.यावेळी अनेक पदाधिकाºयांनी पक्षातील उणीदुणी काढली. पाटील यांचे भाषणही कार्यकर्त्यांमधील उणिवा दूर करण्याच्या अनुषंगानेच झाले. मेळाव्याला आमदार पांडुरंग बरोरा, गणेश नाईक, प्रमोद हिंदुराव, दशरथ तिवरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले, सुभाष पाटील, शहराध्यक्ष सदाशिव पाटील उपस्थित होते.