शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 7:47 PM

मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे .

मीरारोड - मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे . देशातील जनता महागाई , भ्रष्टाचार ,  शेतकरी आत्महत्या, मुली - महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी ने पिचली आहे . राफेल विमान घोटाळ्या प्रकरणी मोदी हे राहुल गांधी यांना घाबरून संसदेतून सुद्धा पळत आहेत . जनतेने मोदींना घरी बसवण्या चा निश्चय करून टाकला आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा कोकण विभाग निरीक्षक बी.एन. संदीप यांनी केली . 

मीरा रोड येथील अस्मिता कॉलेज मध्ये काँग्रेसचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते . यावेळी संदीप बोलत होते . आमदार रामहरी रुपनवार, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राजेश शर्मा,  मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते आदी शिबिरात सहभागी झाले होते . 

देश स्वतंत्र होण्यापूर्वी चा काळ, ब्रिटिश राजवटीत झालेली आंदोलने.  नेत्यांनी दिलेले बलिदान, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस शासन काळात झालेली क्रांती, घेतलेले महत्वपुर्ण  निर्णय, झालेला विकास आदींची माहिती राजीव साहू,चैतन्य रेड्डी, विनोद नायर या वक्त्यांनी करून दिली. पक्षाचे नगरसेवक, सर्व सेल चे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष यांच्या सह १२०० सक्रिय कार्यकर्त्यानी भाग घेतला.  

आलिशान लाखो रुपयांचे कोट घालणाऱ्या मोदींवर राहुल यांनी टीकेची झोड उठवताच मोदी कोट घालायला घाबरतात .  अंबानी व मोदीं बद्दल राहुल बोलतात म्हणून मोदी अंबानींच्या लग्नाला जायला घाबरले .  राफेल वर राहुल बोलतायत म्हणून उत्तर देण्या ऐवजी  मोदी संसदेतून सुद्धा पळ काढत आहेत . मोदी हे राहुल पासून घाबरून पळत असल्याने ते चोर आहेत हे स्पष्ट असल्याचा आरोप संदीप यांनी केला.    

मोदींनी लोकांना खोटी आश्वासने देत फसवणूक करून  सत्ता मिळवली . आणि आम्ही देखील काँग्रेस काळात केलेल्या जनहिताच्या कामांचा प्रचार व प्रसार करायला कमी  पडलो म्हणून हरलो .  आज मोदींच्या राज्यात  अराजकता माजली असून लहान व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून अंबानी, अदानी सारख्या बड्या उद्योजकांना मोदी हजारो कोटींचा फायदा मोदी करून देत आहेत असे संदीप म्हणाले . 

टॅग्स :congressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर