भाकरी फिरविली पाहिजे याचा अर्थ अजित पवारांना दूर करणे; नरेश म्हस्के यांचा दावा

By अजित मांडके | Published: April 27, 2023 06:26 PM2023-04-27T18:26:45+5:302023-04-27T18:27:26+5:30

भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादा यांना दूर केले पाहिजे हे क्लिअर होत असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

naresh mhaske claims on ncp sharad pawar statement | भाकरी फिरविली पाहिजे याचा अर्थ अजित पवारांना दूर करणे; नरेश म्हस्के यांचा दावा

भाकरी फिरविली पाहिजे याचा अर्थ अजित पवारांना दूर करणे; नरेश म्हस्के यांचा दावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत, त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपण सहज समजला पाहिजे. पक्ष संघटनेत आपण नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादा यांना दूर केले पाहिजे हे क्लिअर होत असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यातही यामध्ये अजून काय स्पष्टीकरण पाहिजे तर सकाळच्या भोंग्याला विचारा असा टोलाही त्यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

गेल्या आठवड्यात पवार फॅमिली पैकी कोणाला तरी खासदारकीच्या उमेदवारीवरून अंतर्गत गृह क्लेश झालेला आहे त्याच्यानंतर हा रामायण घडलेला असल्याचेही ते म्हणाले. संजय राऊत हे पत्रकार आहेत. त्यांना बºयाचशा गोष्टी माहित असतात, तुम्ही देखील पत्रकार आहात तर माहिती काढा. मागच्या आठवड्यात गृह क्लेश कशामुळे झाला असा सल्लाही त्यांनी दिला. अजित पवार यांना बाजूला करण्यासाठी सर्व काही खटाटोप राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. भाकरी फिरवली पाहिजे, नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हा रोष आणि रोख अजित पवार यांच्याकडे  जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

अमोल कोल्हे पवार यांच्याशी प्रामाणिक आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे ते खासदार आहेत. पवार यांची जी इच्छा आहे, पवार यांचे जे शब्द आहे, तेच अमोल कोल्हे बोलणार असेही ते म्हणाले. सगळीकडे अजित पवार सुरू असताना ते जयंत पाटलांचे नाव घेणार असतील तर शरद पवार यांची इच्छा काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, असेही ते म्हणाले. नाका समोर  सरकार बदलले आहे, आता काय.. हे लोक बदला घेणार आहे यांच्या जिभेमध्ये फक्त जोर आहे. बदला घेण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो हा त्यांच्यात नाही. दिवसाढवळ्या ५० आमदार निघून जातात, तेरा खासदार निघून जातात, नगरसेवक निघून जातात तर हे काय बदला घेणार असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: naresh mhaske claims on ncp sharad pawar statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.