शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

अजित पवारांची महाविकास आघाडीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

By अजित मांडके | Published: April 18, 2023 5:02 PM

अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांची वज्र मुठीत गळचेपी होत असून ते लवकरच आपला निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करु आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज जरी अजित पवारांनी यातून माघार घेतली असली तरी ते येत्या काही दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनी आज अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टिका केली आहे. त्यांची गळचेपी होत असल्याचे त्यांच्या समर्थक आमदारांना देखील दिसत आहे. संभाजी नगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत देखील ज्यांचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरु झाल्यानंतर त्यांची एन्ट्री होते, आणि ज्यांचे ५६ आमदार आहेत, त्यांना मात्र मानच दिला जात नाही, अशी टिका देखील त्यांनी केली. त्यामुळेच नागपुर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठींबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करु आणि मानाचे पान त्यांना देऊ असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे राहुल गांधी मातोश्रीवर येणार यावरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त करीत उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर कशाही पध्दतीने टिका करतात, त्यांचे पाय मातोश्रीला लागणे हे कदीही न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ते आले नाहीत तर त्यांनी आपला पीए पाठविला आणि उध्दव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनीया गांधी आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील असे सांगितले आहे. त्यामुळे आता दिल्लीला जाऊन मुजरा करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सिल्वर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. अगदी शरद पवार यांनी देखील मात्र आता ती हिम्मत गेली कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारthaneठाणेPoliticsराजकारण