शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

नरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मारकामुळे ऐतिहासीक वारसा जपत पर्यटनालाही चालना मिळणार - राजन विचारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 5:20 PM

 चौक डोंगरावरील २५०० चौ. मी. जागा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित आहे .

मीरारोड - चौक येथील धारावी किल्ल्यावर नरवीर चिमाजी अप्पा यांचा पुतळा बसवल्या नंतर आता या भागाचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार सुशोभीकरण करून स्मारक विकसित केले जाईल . यामुळे ऐतिहासिक ठेवा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचे महत्व वाढणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी परिसराच्या पाहणी दौऱ्या नंतर सांगितले . 

 चौक डोंगरावरील २५०० चौ. मी. जागा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित आहे . २००३ साली महासभेत सदर आरक्षण विकसित करण्याचा ठराव मंजूर झाला होता. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय, संचालनालय यांनी बुरूज, किल्ला व सदरच्या आजूबाजूच्या परिसरातील जागा विकसित करण्यासाठी सन २००४ ला पाहणी करून स्मारक उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात बगीचा विकसित करण्यात आला. 

परंतु नरवीर चिमाजी आप्पा यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता शासनाने स्थापन केलेल्या समितीकडे २००६ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी  हा प्रस्ताव दि. १७ मार्च २०११ रोजी शासनास सादर केला. परंतु त्यावर कार्यवाही न झाल्याने कित्येक वर्ष प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. ही बाब स्थानिक शिवसेना नगरसेविका हेलन जॉर्जी गोविंद यांनी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून  दिली होती . त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात बैठक आयोजित करून सुधारित प्रस्ताव पुन्हा शासनाकडे सादर करण्याची सूचना पालिकेला केली . पालिकेने प्रस्ताव सादर केल्यानंतर  १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मान्यता मिळाल्याचे पत्र मीरा-भाईंदर आयुक्तांना  देण्यात आले अशी माहिती विचारे यांच्या कार्यालया कडून देण्यात आली .  

नरवीर चिमाजी आप्पा यांचा पुतळा चौक येथे बसविण्याचा प्रस्ताव विविध कारणांनी गेल्या १९ वर्षापासून अडकला होता. खा . विचारे यांच्या प्रयत्नां नंतर पुतळा  नुकताच बसविण्यात आला.  खासदार निधीतून २५ लाख रुपये  उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विचारे यांनी आमदार गीता जैन , आयुक्त दिलीप ढोले, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद जॉर्जी, शर्मिला बगाजी सह पुतळा व परिसराची पाहणी केली . यावेळी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर, विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग, शहर प्रमुख पप्पू भिसे, लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उप जिल्हा संघटक विद्या कदम, उपशहर संघटक तेजस्विनी पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील आदी  उपस्थित होते.

स्मारकाच्या ठिकाणी जुन्या दगडांचे अवशेष आहेत त्याचे पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने जतन करा, संपूर्ण स्मारकाला संरक्षण देण्यात यावे. या स्मारकातुन वसईचा किल्ला समुद्रातून दिसण्यासाठी वाढलेल्या वृक्षांची छाटणी करावी. तसेच नव्याने आलेले वृक्ष यांचे पुनर्रोपण दुसरीकडे करण्यात यावे. पुतळ्याच्या देखभालीसाठी हायड्रोलिक यंत्रणा उभारून या ठिकाणी हायमास्ट व विद्युत रोषणाई करण्यात यावी आदी सूचना खा. विचारे यांनी केल्या. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर