ठाणे: नाटक बसत असताना त्याला न्याय देणारी मंडळी ही खरंच नाटकी निघाली तर त्याचे काय होते याचे विनोदी पद्धतीने चित्रण ‘नाटक बसते आहे’ या एकांकिकेमध्ये करण्यात आले होते. अभिनय कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे रंगदेवतेची पूजा पार पडली.
प्रेक्षक प्रतिनिधी विजय परांजपे आणि भारती परांजपे या दाम्पत्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रार्थनेनंतर कट्ट्याच्या कार्यक्र माला सुरवात करण्यात आली. २०१७ च्या जुन महिन्यामध्ये अभिनय कट्ट्यावर सुरू झालेल्या दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी आपल्या धमाकेदार नृत्याविष्काराद्वारे सादरीकरणास आरंभ केला. यामध्ये पार्थ खडकबाण, भूषण गुप्ते, आरती गोडबोले, ऋतुजा गांधी, संकेत भोसले, अन्मय मेत्री, अविनाश मुंगसे, गौरव राणे, अपूर्वा दुर्गुळे या दिव्यांग कलाकारांचा समावेश होता. तीन वेगवेगळ््या गाण्यांवर सलग १५ मिनिटे ताल धरत या सर्व कलाकारांनी एनर्जी म्हणजे काय याचा आदर्श इतर कलाकारांसमोर ठेवला. ‘नाकावरच्या रागाला’, ‘तारे जमीन पर’ व ‘रोबो डांस’ या तीन वेगवेगळ््या गाण्यांवर ताल धरीत आपल्या अनोख्या शैलीने या सर्वच दिव्यांग कलाकारांनी रिसकांच्या मनाला भुरळ घातली. या सर्वच सादरीकरणानंतर अभिनय कट्टा संचालक व दिव्यांग कला केंद्राचे जनक किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत या अनोख्या कला केंद्रामागील भावना आणि हेतू स्पष्ट करीत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लबच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष विजय परांजपे यांच्या हस्ते सर्व दिव्यांग मुलांचा गौरव करण्यात आला. तसेच आपल्या शैक्षणिक कारिकर्दीत स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केलेल्या भारती परांजपे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेल्या एकूण ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अभिनय कट्ट्यावर किरण नाकती यांच्या हस्ते करण्यात आला.कट्टयाच्या शेवटच्या सत्रात वि.वा.शिरवाडकर लिखित आणि किरण नाकती दिग्दिर्शत ‘नाटक बसते आहे’ या धम्माल विनोदी एकांकिकेची मंडळी सुद्धा सज्ज झाली होती. शिरवाडकरांच्या लेखणीतून अवतरलेल्या या नाटकामध्ये नाटक बसत असताना घडत असलेले विनोदी किस्से, एका प्रामाणकि लेखकाने लिहिलेल्या संहितेची लेखकाच्या गैरहजेरीत फक्त व्यायसायिक ईर्षेपोटी संहितेची केलेली विवंचना व रक्ताचं पाणी करत आपल्या कलाकारांना शिकवीत असलेल्या दिग्दर्शकाचे निर्माता व नाटकाच्या रंगेल अभिनेत्रींमुळे झालेले हाल याचे विडंबनात्मक दिग्दर्शन किरण नाकतीजींच्या दिग्दर्शकीय नजरेतून खुबीने रंगवले गेले. संकेत देशपांडे (आर्ट डायरेक्टर), प्रशांत सकपाळ (सहादू),पियुष भोंडे (दिग्दर्शक),आदित्य नाकती(मॅनेजर),संदीप पाटील(मालक), वैभव चव्हाण (नानाशेठ), वैभवी वंजारे (चमेली बाई) आणि निलेश भगवान (लेखक) या कलाकारांचा समावेश होता. एकांकिकेच्या प्रयोगानंतर कलाकार संकेत देशपांडे याने आपले मनोगत व्यक्त करत प्रेक्षकांशी संवाद साधला तर स्वत: दिग्दर्शक किरण नाकती यांनी सुद्धा या एकांकिकेचा आतापर्यंतचा प्रवास हा कसा मनोरंजनात्मक कसा ठरला याचा उलगडा रसिकांसमोर केला. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहातील टाळ््यांचा कडकडाट व क्षणोक्षणी हास्यांचा गडगडाट ही या कलाकृतीची खरी पोचपावती होती. एकंदरीत २०१८ ची सुरु वात अभिनय कट्ट्याच्या प्रत्येक रसिकाने लोटपोट हसून केली. सदर कार्यक्र माच्या निवेदनाची धुरा ही स्वप्नील काळे यांनी पार पाडली आणि पुढील रविवारी सुद्धा उपस्थित राहण्याचे आव्हान रसिकांना करत कार्यक्र माची सांगता केली.