भिवंडी-भिवंडीतील बिएनएन महाविद्यालयात केम स्टार सायन्स क्लब व महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी बिएनएन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तथा केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. के.एन.पाटणकर- जैन,जैष्ठ संशोधक प्रा.डॉ दिलीप काकविपुरे,भिवंडी मनपा उपायुक्त प्रणाली घोंगे,सहआयुक्त प्रीती गाडे,मनपा पर्यावरण विभाग प्रमुख नितेश चौधरी,पत्रकार नितीन पंडित,शरद भसाळे,केमिस्ट्री विभागाचे प्रा.पुंडलिक वारे व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी स्त्री पुरुष समानता,स्त्रियांचे लैंगिक व सामाजिक शोषण,कौटुंबिक हिंसा,स्त्री भ्रूण हत्या,हुंडा पद्धती,बालिका व महिला सुरक्षितता व शिक्षण आदी मुद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी बिएनएन महाविद्यालयाच्या मुलींनी महिला सक्षमीकरण,स्त्रीसमानता व स्त्री भ्रूणहत्या रोखण्या संदर्भात जनजागृती करणारे पोस्टर व चित्रांचे सादरीकरण केले, तसेच फेस आर्ट द्वारे कार्यक्रमाची माहिती दिली, त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचे पेहराव करत त्यांच्या कार्याची माहिती दिली.त्याचबरोबर कवितेच्या माध्यमातून देखील महिला सक्षमीकरणासंदर्भात माहिती दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सागर सानप यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.प्रियंका जाधव यांनी केले.