शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग : ठाण्यात सफाई कामगारांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 6:49 AM

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची धुरा ज्या सफाई कामगारांच्या खांद्यावर आहे, त्यांना हक्काचे घर, वेतनातील फरक, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघड झाली.

ठाणे - स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची धुरा ज्या सफाई कामगारांच्या खांद्यावर आहे, त्यांना हक्काचे घर, वेतनातील फरक, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघड झाली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी महापालिका अधिकाºयांना विचारलेल्या अनेक प्रश्नांची धड उत्तरे त्यांना देता आली नाहीत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अनुपस्थितीबाबत तसेच बैठकीच्या अखेरीस दाखल झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या लेटलतिफीबाबतही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत शनिवारी प्रधान सचिवांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जाईल आणि त्यांच्याकडून कारवाई झाली नाही, तर उच्चाधिकाºयांकडे कारवाईचा आग्रह धरला जाईल, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर हाथीबेड यांनी दिली. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणे महापालिका, पोलीस विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आदींसह विविध सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणाकरिता असलेल्या निधीपैकी किती उपलब्ध झाला, त्यापैकी किती खर्च झाला, त्याचा विनियोग कसा झाला, अशी माहिती हाथीबेड यांनी पालिका अधिकाºयांना विचारली. परंतु, अशा प्रकारचा निधी मिळत असल्याची माहिती नसल्याचे धक्कादायक उत्तर पालिकेच्या अधिकाºयांनी दिले. केवळ एकमेकांची तोंडे बघण्यातच त्यांनी धन्यता मानली. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी मागासवर्गीयांच्या निधीचा उल्लेख करत त्याच्या जमाखर्चाची माहिती दिली. परंतु, त्यातील किती निधी दुर्बल घटकांसाठी खर्च झाला, याचे समाधानकारक उत्तर त्यांच्याकडेही नव्हते. उलटपक्षी, हा निधी इतर कामासाठी खर्च झाल्याची बाब यावेळी उघड झाल्याने हाथीबेड यांनी नापसंती व्यक्त केली. सफाई कामगारांसाठी किती समाजभवने उभारली, वाचनालये, अभ्यासिका आदींसह इतर कोणत्या सुविधा पुरवल्या, या प्रश्नाचे उत्तरही नकारार्थी मिळाल्याने पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला. सफाई कर्मचाºयांची नियमित वैद्यकीय तपासणी होत नसल्याचे युनियनच्या पदाधिकाºयांनी हाथीबेड यांच्या निदर्शनास आणले.सफाई कर्मचाºयांच्या विविध युनियनच्या पदाधिकाºयांनी पालिकेची लक्तरेच वेशीला टांगली. सफाई कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, पीएफचे पैसे दिले जात नाहीत, २१ दिवसांची रजा दिली जात नाही किंवा त्याचे पैसेही दिले जात नाहीत. सामूहिक विमा काढला गेलेला नाही, किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही, लेव्हीचे पैसे दिले जात नाहीत, असे अनेक मुद्दे युनियनच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केले. त्यावर, स्पष्टीकरण देताना उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी हे आरोप जुने असून वस्तुस्थिती तशी नाही, असा दावा केला. सफाई कर्मचाºयांच्या देण्याबाबत निर्णय घेण्याकरिता सीएची नेमणूक करण्यात आली आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करून निधी दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, दोन वर्षे उलटूनही अभ्यास का होत नाही, असा सवाल हाथीबेड यांनी उपस्थित केला. किती दिवसांत थकबाकी दिली जाईल, याचे उत्तर त्यांनी मागितले. पालिकेच्या अधिकाºयांना ते देता आले नाही.सफाई कामगारांची पाडलेली घरे अद्याप उभारण्यात आलेली नसल्याकडे युनियनने लक्ष वेधले. त्याचेही समाधानकारक उत्तर पालिकेला देता आले नाही. सफाई कामगारांकरिता किती वास्तू उभारल्या आहेत, त्या कुठे उभारल्या आहेत, याची माहिती देण्यासाठी पालिकेच्या इस्टेट विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.जिल्हा परिषदेची त्रेधा, पण पोलीस-रूग्णालय समाधानकारकजिल्हा परिषदेच्या अधिकाºयांचीही हाथीबेड यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्रेधातिरपीट उडाली. सफाई कामगारांच्या मुलांकरिता वसतिगृहे आहेत का, मुलांसाठी कोणकोणती व्यवस्था केली आहे, आदी सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यास जिल्हा परिषदेचे अधिकारी सपशेल अपयशी ठरले. पोलीस आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संबंधित अधिकाºयांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.प्रोटोकॉलनुसार या बैठकीला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, हे दोघे गैरहजर राहिल्याबद्दल हाथीबेड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. बैठक संपण्याच्या पाच ते १० मिनिटांपूर्वी जिल्हाधिकारी कल्याणकर हजर झाले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे