डोंबिवली : मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय महिला आंतरविद्यापीठ टेनिस स्पर्धेचा समारोप पलावा येथील ऑलिम्पिक क्रीडा संकुल येथे झाला. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा या पाच राज्यांतील विविध विद्यापीठांतील विद्यार्थिनींचा विशेष सहभाग होता. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील रंजक स्पर्धेनंतर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मुंबई विद्यापीठ, मुंबई तर तृतीय क्रमांक एल. एन. ग्वाल्हेरच्या विद्यार्थिनींनी पटकवला. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे सुबोध दवे, बिर्ला महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेशचंद्र आणि डॉ. मोहन अमरुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदुरानी जाखड उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचा डॉ. नरेशचंद्र यांच्या हस्ते स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मोहन अमरुळे, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरीश दुबे, क्रीडा संचालक अनिल तिवारी, वाय. डी. बागराव आदींची उपस्थिती महत्त्वाची होती.
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये तुषार लोंढे, जितेंद्र शैनी, प्रा. गणेश कुमावत, डॉ. अभिजीत रावल, डॉ. दिनेश वानुले, डॉ. नारायण तोटेवाड, रेवती हुन्सवाडकर, निश्मिता राणा यांच्यासह अन्य व्यक्तींनी परिश्रम घेतले.