शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

रामदेव बाबाविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

By अजित मांडके | Published: November 26, 2022 5:57 PM

पोस्टर जाळून निषेध, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महिलांच्या वेशभूषेवरुन अश्लील टिप्पणी करणारे योगगुरु रामदेव बाबा यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे - पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे - पालघर विभागीय अध्यक्षा ॠता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करुन रामदेव बाबांचे पोस्टर्स जाळले.

ठाणे शहरात गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रामदेव बाबा यांचे योग शिबिर होते. या योग शिबिरामध्येच रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस यांच्यासमोरच कपड्यांशिवाय महिला चांगल्या दिसतात, अशा आशयाचे विधान केले होते. या विधानानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष कार्यालयानजीक रामदेव बाबा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘रामदेव बाबा मुर्दाबाद, रामदेव बाबा हाय -हाय, रामदेव बाबाला अटक झालीच पाहिजे’अशा घोषणा देत रामदेव बाबांच्या पोस्टरला जोपडे मारुन ते जाळले.

यावेळी सुजाता घाग यांनी, रामदेव बाबा यांनी या आधीही अशी काही विधाने केली आहेत. आता तर त्यांनी हद्दच पार केली आहे. रामदेव बाबा यांनी केलेल्या या विधानामुळे समस्त महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न झालेली असल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. या आंदोलनात रचना वैद्य, मेहरबानो पटेल, कांता गजमल, माधुरी सोनार, ज्योती निंबर्गी, अनिता मोटे, शुभांगी खेडेकर, साबिया मेमन, सुवर्णा खिल्लारे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNCPराष्ट्रवादी काँग्रेस