डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या केडीएमसीतील त्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच भाजपात आल्यावर कोणकोणती आश्वासने मिळणार, मानसन्मान राखला जाणार की नाही यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही स्वागतच आहे, उरले मानसन्मानाचे एकदा या अनुभवा पुन्हा कुठेही अन्यत्र जाण्याची वेळ पडणार नाही असे आश्वस्त केले आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, नरेंद्र पवार उपमहापौर राहुल दामले आदीही उपस्थित होते. सुमारे २५ हून कार्यकर्ते-पदाधिका-यांनी एनसीपीत सुरु असलेला मनमानी कारभार मान्य नसल्याचे सांगत पक्षश्रेष्ठी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे राजीनाम्याचे लेखी पत्र दिले होते. महिनाहून अधिक काळ झाला तरीही त्याकडे पक्षश्रेष्ठींनी काणाडोळा केल्याने संबंधित नेते आणखी नाराज झाले. दरम्यानच्या कालावधीत त्यांना भाजपाच्या माध्यमातून आमदार रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे यांनी नक्कीच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसे केलेही, त्यानुसारच मंगळवारी मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांची भेट करुन दिली.
राष्ट्रवादीला खिंडार
By admin | Published: August 05, 2015 12:29 AM