शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

थर्टी फर्र्स्टसाठी नव्वदीतील हेअर स्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 4:55 AM

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा फिव्हर सर्वत्र दिसू लागला आहे. सेलिब्रेशन पार्टीसाठी आकर्षक लूक असण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे अर्थात सलूनमध्ये तरुणाईची पावले वळली आहेत.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा फिव्हर सर्वत्र दिसू लागला आहे. सेलिब्रेशन पार्टीसाठी आकर्षक लूक असण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे अर्थात सलूनमध्ये तरुणाईची पावले वळली आहेत. यात हेअर स्टाइल, हेअर कट, हेअर कलर, ट्रेण्डी बीअर्ड करण्यावर त्यांचा भर आहे. नव्वदच्या दशकातल्या हेअर स्टाइल पुन्हा नव्या रूपात पाहायला मिळत आहे. या हेअर स्टाइलकडे तरुणीही आकर्षित झाल्या असून पार्टीसाठी त्यांनी या हटके हेअर स्टाइलला पसंती दिली आहे.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. १५ दिवसांपासूनच सेलिब्रेशनच्या योजना आखण्यास सुरुवात झाली होती. दिवस जवळ येत होता, तसे युद्धपातळीवर बेत आखले जाऊ लागले. यावेळेस वीकेण्डला थर्टी फर्स्ट न येता सोमवारी आल्याने बहुतांशी तरुणाईने शुक्रवार रात्रीपासूनच सेलिब्रेशन करण्याचा प्लान केला आहे.तीन दिवस आधीच साजरे करणारे हे मुंबईच्या बाहेर जाण्यास सज्ज झाले आहे. काही जण आपल्या इमारतीच्या गच्चीवर, कोणी एखादे हॉटेल, काही जण पबमध्ये तर काही फार्म हाउसवर करणार आहेत. जसे एकीकडे प्लानिंग केले जात होते, तसे दुसरीकडे आपला लूक हटके असावा, याकडे तरुणाई लक्ष देत आहे.हे कट आहेत तरुणाईची पसंतीयंदाच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी नव्वदच्या दशकातील हेअर स्टाइलला पसंती दिली जात आहे. यात मुलींचा कल सिक्स्टीज फ्लिप कट, स्पायकी पिक्सी, हाय अ‍ॅण्ड टाइट पोनी, सुपर ब्लण्ट बॉप तर हेअर कटमध्ये स्ट्राँग बॉब, कर्ली फ्रिंच, अण्डर कट, दी शॅक याकडे वळत आहेत.मुलांमध्ये क्विथ, स्पाइकी क्विफ, कर्ली क्रॉप, आयब्रो कट, क्रू कट या हेअरकटचा तर पोनीटेल, मॅनबन, डेडलॉक, टॉप नॉट या हेअर स्टाइलचा बोलबाला आहे, अशी माहिती हेअर स्टायलिस्ट रुशील मोरे यांनी दिली.रिच मोका हायलाइट्स, शॅडो रुट्स, वायब्रण्ट रेड, बालियाच, कुल अ‍ॅश हेअर या प्रकारांच्या हेअर कलरला तरुणतरुणी पसंती देत आहेत. कुल अ‍ॅश हेअर हा हेअर कलर तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहे.जसे हेअर स्टाइल करून आपला लूक बदलण्याकडे तरुणाई वळत आहे, तसे दाढी कोरण्याचा ट्रेण्डही तरुणाईमध्ये यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.गोपी स्टाइल ही दाढीच्या डिझाइनमध्ये जास्त प्रचलित झाली आहे. त्यामुळे तरुण मुले या स्टाइलकडे वळत आहे. थिक बीअर्ड, फेडेड बीअर्ड हे दाढीचे प्रकार असून दाढी कोरण्याच्या डिझाइन्सही आहेत. त्यात पूर्वीचा ट्रेण्ड नव्या रूपात आला आहे. सॉल्ट अ‍ॅण्ड पिपर, लाइन आॅक्स यासारखे डिझाइन्स आहेत, असे रुशील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे