ठाणे :आग्नेय ते वायव्य अशी आमची आठ आठवडी "गिरीजा" यामोटारीने केलेली बारा हजार कि.मी. अंतराची अनोखी हिम यात्रा निसर्गाच्या मर्जीनुसार केली. हिमालय आपल्याशी संवाद साधत असतो,संकेत देत असतो.त्याचावेध घेण्यात तुम्ही शरीर,मन आणि बुद्धीने किती सक्षम आहात, यावर तुमची हिम यात्रा सुफळ - संपूर्ण होणे अवलंबून असते."हिम यात्रा - २०१८" आपण दृकश्राव्यमाध्यमातून बघताना प्रत्येक सप्तरंगी छायाचित्र तुमच्या नेत्रांचे पारणे फेडत होते. खरोखरच,निसर्ग हा ऐक कसबी शिल्पकार तर सूर्य हा ऐक पट्टीचा चित्रकार आहे, याची क्षणोक्षणी साक्ष पटवणारी आमची हिम यात्रा संस्मरणीय झाली,असे मनोगत पर्यटन क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाची अमिट मोहोर उमटवणारे ठाण्याचे ६३ वर्षीय जेष्ठ हिम यात्री वसंत (बाळा) लिमये यांनी व्यक्त केले.
मित्र मंडळी, ठाणे यांच्या विद्यमाने ठाण्याच्या सहयोग मंदिरात सिक्कीम ते लडाख अशी १२ हजार कि.मी. लांबीची २ महिन्यांची अनवट वाटेवरची हिम यात्रा करणारे वसंत (बाळा) लिमये "साद हिमालयाची" या विषयावर अनुभवकथनावर आधारीत गप्पा मारताना बोलत होते.सोबत सहयात्री क्टर आनंद नाडकर्णी व मुलाखतकार श्रीमती शिरीष अत्रे व्यासपीठावर उपस्थित होते.डॉक्टर नाडकर्णी म्हणाले कि या प्रवासात काळजी करू या पेक्षा काळजी घेऊ , अशी माझी मनोधारणा होती.सकाळी सातला निघायचे,दुपारचे जेवण वाटेतच व्हायचे आणि तीनच्या पुढे वेध लागायचे ते मुक्कामाचे. मात्र या प्रवासात ऐक नक्की, मुक्काम नव्हे तर गाव आणि गाववाले यांच्याशी संपर्क व संवाद साधणे आम्हाला महत्वाचे वाटले.तारांकित पर्यटनात जी मजा आपण लुटू शकत नाही ती येथे मनमुराद लुटली. कविता आणि निसर्ग रेखाचित्रे हे माझे आवडीचे छंदही जपता आले.या यात्रेत स्थानिकांचा सल्ला बहुमोल ठरला.काश्मीर ते कन्याकुमारी सहल रेल गाडीने करणारे सव्वाशे वर्षे जुन्या ठाण्याच्या मो.ह. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सुबोध देशपांडे व अविनाश बर्वे यांनी अनुक्रमे वसंत (बाळा) लिमये व डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गिरीजा मोटारीचे चालक अमित शेलार व दृक श्राव्य सादरीकरणाचेछायाचित्रकार निर्मल खरे यांचा विशेष गौरव करण्यांत आला.शेवटी माधुरी दिघे यांनी आभार मानले.ठाणेकर पर्यटन प्रेमींचा उत्तम प्रतिसाद या उपक्रमास लाभला.