ठाणे : मुंबईसह ठाणे शहर परिसरात महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनसाखळी खेचून दुचाकीवरुन पलायन करणाºया एका २४ वर्षीय ‘टॉप २०’ मधील कुख्यात गुंडासह इराणी टोळीतील तीन चोरट्यांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी भिवंडीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविलीभिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हे इराणी टोळके असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. तिच्या आधारे जाधव यांच्यासह निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर आणि प्रशांत आवारे तसेच २० ते २५ जणांच्या पथकाने सकाळी ९ ते १२ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई केली. पोलीस व्हॅनसह तीन छोट्या खासगी टेम्पोतून पोलिसांनी इराणी वस्तीच्या परिसरात शिरकाव केला. एक ते दोन तास सापळा लावल्यानंतर २४ वर्षीय इराणीला ओउळकर यांच्या पथकाने पकडले. त्यानंतर एक ६० वर्षीय तर दुसरा २३ वर्षीय अशा तिघांना धुमाळ यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी मुंबई, ठाण्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दुचाकीवरून येऊन अनेक महिलांची मंगळसूत्रे हिसकावल्याची माहिती तपासात निष्पन्न होत असल्याचे नौपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांनी नेमकी कोणत्या ठिकाणी आणि कोणाची मंगळसूत्र किंवा सोनसाखळी हिसकावली, याबाबतची सखोल चौकशी सुरू असल्यामुळे या तिघांनाही अद्याप अटक केली नाही. त्यामुळे त्यांची नावे प्रसिद्ध करता येणार नसल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.दोन दिवसांत दोन सापळेइराणी टोळीतील सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यासाठी नौपाडा पोलिसांनी गेल्या तीन दिवसांमध्ये दोन वेळा सापळा लावला होता. सोमवारीही पोलिसांचे पथक भिवंडीत तळ ठोकून होते. परंतु, त्यावेळी या पथकाची चाहुल लागल्यामुळे हे टोळके पसार झाले होते. मंगळवारी मात्र गनिमी काव्याने त्यांच्याच वस्तीत सापळा लावून या पथकाने त्यांच्यापैकी तिघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्यापैकी एकाशी या पथकाची झटापटही झाली होती. तरीही पळण्याच्या बेतात असलेल्या या तिघांनाही त्यांनी पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नौपाडा पोलिसांनी भिवंडीतून पकडले तीन कुख्यात इराणी सोनसाखळी चोरटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 7:45 PM
भिवंडीच्या शांतीनगर परिसरातून ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी इराणी टोळीतील तीन सोनसाखळी चोरटयांना ताब्यात घेतले आहे. टॉप २० मधील एका कुख्यात चैन स्रॅचरचाही त्यामध्ये समावेश आहे.
ठळक मुद्देटॉप २० मधील कुख्यात गुंडाचाही समावेशमुंबई, ठाण्यात सोनसाखळी चोरीचा उच्छादसोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता