भिवंडी: गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरी आणि परिसरांत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने यंदा योगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात सुरू असुन या बाबत भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थानाचा जनरेटर नादुरूस्त असल्याने आणि मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने ऐन नवरात्रीच्या काळात मंदिरात मेणबत्त्या लावून देवीची पुजा करण्याची वेळ पुजाऱ्यांवर आली आहे.महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले तिर्थक्षेत्र आणि तमाम आगरी-कोळी बांधवांची कुलदेवी असलेल्या योगीनी वज्रेश्वरी देवीचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे. वज्रेश्वरी देवी बाबत अशी आख्यायीका सांगीतली जाते की,त्रेतायुगात कालिकात व सिंहमार हे दोन दैत्य उन्मत्त बनले होते. या असुरांनी भूतलावर मोठा धुमाकूळ घातला होता. या असुरांपासून ऋषीमुनींचे व लोकांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांचा नाश करण्यासाठी सर्व देवी देवतांनी वशिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली या भूमीत त्रिचंडी यज्ञ करण्याचे योजिले.या ठिकाणी गरम पाण्याची कुंडे निर्माण केली. या यज्ञाकरीता इंद्रदेवांना आमंत्रण न दिल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि आपल्यावर वर्चस्व करण्याचा देवांचा व वसिष्ठ मुनींचा डाव आहे,असे समजून इंद्र देवाने त्रिचंडी यज्ञावर व वशिष्ठावर महाभयंकर असे वज्र सोडले. या वज्रामुळे यज्ञाच्या ठिकाणी प्रलय निर्माण झाले. तेव्हा भयभीत ऋषीमुनींनी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेची आळवणी सुरू केली. तेव्हा पार्वती मातेने इंद्राने फेकलेले महाभयंकर वज्र पडण्यापूर्वी गिळून टाकले व दोन्ही असुरांचा वध केला. त्यानंतर या भूमीतील यज्ञयाग यथासांग पार पडले. तेव्हापासून या देवीने वज्रेश्वरी नांव धारण करून भक्तांच्या रक्षणासाठी व कल्याणाकरिता कालिका व रेणुका या देवींसह वज्रेश्वरी गावात वास्तव्यास आहे.दिपमाळे समोर बावन्न पायºयांचे देवीचे भव्य मंदिर किल्लेवजा तटांनी बांधलेले आहे. पेशवेकाळात चिमाजी आप्पा जेंव्हा वसईच्या स्वारीवर निघाले, तेव्हा या ठिकाणी त्यांनी देवीला नवस केला की जर मी वसई सर केली तर तुझे मंदिर किल्ल्यासारखे बांधेंन. तेव्हा देवीच्या आशीर्वादाने चिमाजी आप्पानी मोहीम यशस्वी केली आणि परतल्यानंतर देवीचे भव्य असे किल्यासारखे मंदिर बांधले.तसेच देवीच्या दैनंदिन पूजा आर्चनासाठी परिसरातील सात गावे इनाम म्हणून दिली.ठाणे व पालघर जिल्ह्यातील भक्तांना देवीचे फार महत्व असुन नवरात्रौच्या काळात या देवळात लाखो भाविकांची गर्दी होत असते.अशा स्थितीत शासनाने या देवस्थानासाठी विविध सोयी उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. किमान अश्विन व चैत्र नवरात्रौ उत्सवाच्या वेळी तसेच देवीच्या जत्रेच्या वेळी भाविकांच्या सोयीसाठी वीजेच्या सोयीसह इतर मुलभूत सुविधा मंदिराचे संस्थानीक व शासनाच्या प्रतिनीधींनी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या वीजवितरण कंपनीच्या वसई डिवीजन मधून या परिसरांत वीज पुरवठा होत असुन पारोळ सब स्टेशनमधून वज्रेश्वरीसह परिसरांतील गावांना वीजपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरीसह इतर गावांंमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असल्याने दर्शनाला येणाºया भाविकांची गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व तहसिलदार शशीकांत गायकवाड यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.
वीजेच्या लपंडावाने तिर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:58 PM
भिवंडी : गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरी आणि परिसरांत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने यंदा योगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात सुरू असुन या बाबत भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थानाचा जनरेटर नादुरूस्त असल्याने आणि मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने ऐन नवरात्रीच्या काळात मंदिरात मेणबत्त्या लावून देवीची पुजा करण्याची वेळ ...
ठळक मुद्देयोगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारातशासनाच्या वीजवितरण कंपनीच्या वसई डिवीजनचे दुर्लक्षचिमाजी आप्पानी बांधले किल्यासारखे मंदिर