शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

आजपासून नवरात्रोत्सव , ठाणे शहरात दीड हजार मूर्तींचे झाले आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:57 AM

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजार सार्वजनिक व खाजगी देवीच्या मूर्तींचे रविवारी मोठ्या धुमधुडाक्यात आगमन होणार आहे.

ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजार सार्वजनिक व खाजगी देवीच्या मूर्तींचे रविवारी मोठ्या धुमधुडाक्यात आगमन होणार आहे. दोन हजार ७४६ ठिकाणी घट व कलश तसेच प्रतिमा बसवण्यात येणार आहेत.अशाप्रकारे एकूण चार हजार २३२ मूर्ती, घट आणि प्रतिमांची पूजाअर्चा रविवारपासून सलग नऊ दिवस केली जाणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये.यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह सुमारे पाच हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर आयुक्तालयातील परिमंडळ एक ठाणे शहरामध्ये सार्वजनिक स्वरु पाच्या ११२ तर खाजगी २३१ मूर्ती आणि सार्वजनिक स्वरु पाचे ११ आणि खाजगी ६८४ घटस्थापन होणार आहेत. परिमंडळ २ भिवंडीमध्ये ८७ सार्वजनिक आणि १९३ खाजगी मूर्ती तर सहा सार्वजनिक, एक हजार १२३ खाजगी घट; परिमंडळ ३ कल्याणमध्ये १३४ सार्वजनिक अन १६१ खाजगी मूर्ती तर १२ सार्वजनिक अन ४९० खाजगी घट; परिमंडळ ४ उल्हासनगरमध्ये सार्वजनिक ११७ मूर्ती आणि ८४ खाजगी मूर्ती तर आठ सार्वजनिक व ३८९ खाजगी ठिकाणी घटस्थापना होणार आहे. तसेच परिमंडळ ५ वागळे इस्टेटमध्ये १५३ सार्वजनिक आणि २१४ खाजगी मूर्ती तर १२ सार्वजनिक आणि ११ खाजगी घटांची स्थापना होणार आहे.दरम्यान, ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, १२ सहायक पोलीस आयुक्त,९७ पोलीस निरीक्षक, २६७ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तीन हजार ६५७ पोलीस कर्मचारी तसेच तीन एसआरपीएफच्या तुकड्यासह ६०० होमगार्डची फौज असा चोख बंदोबस्त ठेवला आहे. नवरात्रोत्सवात तरु णाई रासगरबा खेळण्यास बाहेर पडत असल्याने साध्या वेषातही पोलीस तैनात राहणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेNavratriनवरात्री