पालघर : गडचिंचले गावात साधूंची हत्या घडविण्यास कारणीभूत असलेली अफवा कोणी पसरविली याचा शोध घ्यावा आणि यामागे नक्षलवादाचे कनेक्शन असल्यास ते शोधावे, अशी मागणी विवेक विचार मंचने मंगळवारी केली. १६ एप्रिलला गडचिंचले या गावातील हल्ल्यात दोन साधूंसह एका वाहनचालकाचा मृत्यू झाला होता.आदिवासी समाज क्रूर कसा झाला? त्यांनी साधूंची निर्घृण हत्या कशी केली? त्यांना हिंदू परंपरांपासून तोडण्याचे षड्यंत्र आहे का, ख्रिश्चन मिशनरींचाही हात आहे का?, याचा शोध घ्यावा असा मुद्दा त्यांनी मांडला. हिंदूंच्या देवी-देवता, परंपरा आपल्या नाहीत, असा प्रचार या भागात केला जातो, असा मुद्दा मंचाने मांडला आहे.वेब पत्रकार परिषदेत मंचाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल मांडण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अॅड. समीर कांबळे, अॅड. प्रवर्तक पाठक, पत्रकार किरण शेलार, आदिवासी कार्यकर्ते संतोष जनाठे, निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण खरपडे यांचा समावेश होता. या समितीचा अहवाल राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्याचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आला आहे.‘सातत्याने खोटे आरोप’गेले दोन महिने सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत. आजही कोणतेच नवे पुरावे मांडलेले दिसून येत नाही. या समितीतील निवृत्त न्यायाधीश स्वत: जिल्ह्यात फिरल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. आरोप केलेल्या संघटनांचा या घटनेशी संबंध असल्याचे कुठेही स्पष्ट म्हटलेले नाही.- ब्रायन लोबो, कष्टकरी संघटना
साधू हत्या प्रकरणात नक्षलवादी कनेक्शन?; विवेक विचार मंचचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 4:35 AM