शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

"टोमणे मारणं सोप्पं काम नाही, उद्धव ठाकरे यांचा टोमणे मारायचा स्वभाव मला आवडतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 8:36 PM

एखाद्या वाक्यातून एखादा शब्द बाहेर काढणे त्यातून कोटी करणे. यात मज्जा येते. त्यातून त्यांची हुशारी दिसते असं कौतुक आव्हाडांनी केले आहे.

ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे गटाकडून आयोजिक आरोग्य शिबिराचं त्यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड हेदेखील होते. उद्धव ठाकरेंचा स्वभाव मला खूप आवडतो. उद्धव ठाकरेंबद्दल मला आपुलकी आहे. सहवासामुळे माणूस समजतो. त्या प्रेमापोटी मी त्यांच्या भेटीला गेलो होतो असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मानवी नाते मला महत्त्वाचं वाटतं. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पहिल्यापासून त्यांचा स्वभाव आवडतो. त्यांचे टोमणे मारणे, व्यंगात्मक बोलणे, एखाद्या वाक्यातून एखादा शब्द बाहेर काढणे त्यातून कोटी करणे. यात मज्जा येते. त्यातून त्यांची हुशारी दिसते. टोमणे मारणे सोप्पे काम नाही. टोमणे मारताना त्यावेळेला कुठला टोमणा किंवा शब्द गेला पाहिजे हे लक्षात हवं. शब्दफेक ही कमालीची कला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच महाविकास आघाडी होणार असं मला वाटते. पण ते वरिष्ठ नेते ठरवतील. प्रकाश आंबेडकर जे बोलले त्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आहे. सत्ता असो किंवा नसो आम्ही शरद पवारांबद्दल काहीही बोलले सहन करणार नाही. सत्ता ही फार महत्त्वाची आहे असे नाही. माझ्या ३५ वर्षातील आयुष्यात केवळ ३ वर्ष मंत्री होतो. ३२ वर्ष रस्त्यावरच गेली. त्यामुळे फरक काय पडतो. ज्या बापाला आपण बाप मानलाय त्याबद्दल कुणी असे बोलले तर मी विरोध करेन. एकटा असलो तरी विरोध करेन असं विधान जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर केले आहे. 

टोमणे शब्दावरून भाजपा उद्धव ठाकरेंना डिवचतंमविआ सरकार काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांच्याकडे असा बॉम्ब आहे जो कुणाकडेच नाही तो म्हणजे टोमणे बॉम्ब असा शब्दप्रयोग केला होता. तेव्हापासून विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणात केवळ टोमणेच असतात दुसरं काहीही नसते अशी टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे टोमणे या शब्दावरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम भाजपाकडून वारंवार केले जाते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरे