सदानंद नाईक, उल्हासनगर : तक्रार केलेल्या इमारतीवर कारवाई न होण्यासाठी ५० लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते ओमी कलानी यांच्यासह एकावर खंडणीचा उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हा खोटा असून पोलिसांनी चौकशी विना अटक केल्यास, जामीन घेणार नसल्याची भूमिका ओमी कलानी यांनी घेऊन पोलिसांना धर्म संकटात टाकले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ नेहरू चौक परिसरात बांधलेल्या कृष्णा निवास कॉ.ऑफ सोसायटी ही तीन मजली इमारत असून इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. तसेच शासनाच्या नवीन नियमानुसार रिवाईज्ड प्लॅन महापालिका नगररचनाकार विभागाकडे टाकला. मात्र रिवाईज्ड प्लॅनला परवानगी देऊ नका. असा पाठपुरावा ओमी कलानी यांनी नगररचनाकार विभागाकडे केला. दरम्यान सदर इमारत अवैध असल्याचे पत्र टीम ओमी कलानीच्या लेटरपॅडवर एका इसमाने कलानी महल येथून आल्याचे सांगून दुकानदारांना दिले. तसेच यावेळी अनोळखी इसमाने, यावेळी भेटलेले धीरेन वधारीया यांच्याकडे इमारतीवर कारवाई न करण्यासाठी ५० लाखाची मागणी ओमी कलानी यांनी केली. असा आरोप धीरेन वधारीया यांनी केला. तसेच याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५० लाखाच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर पोलिसांनी मंत्र्यांच्या दबावाखाली खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी केली. तसेच पोलिसांनी चौकशी विना आपल्याला अटक केल्यास, जामीन घेणार नसल्याचे कलानी यांनी सांगितले. कृष्णा निवास इमारतीची तक्रार सुरवातीला तत्कालीन महापौर पंचम कलानी यांनी केली होती. त्यानंतर तत्कालीन आमदार ज्योती कलानी यांनी पाठपुरावा केल्याची माहिती ओमी कलानी यांनी दिली. तसेच त्यानंतर ओमी कलानी हे याबाबत पाठपुरावा करीत आहेत. यासर्व प्रकरणात पुन्हा महापालिका नगररचनाकार विभाग वादात सापडला आहे. नगररचनाकार विभागावर आरोप-प्रत्यारोप होत असून विभागाची चौकशी करण्याची मागणी शहरातून होत आहे. तसेच महापालिकेने कृष्णा निवास कॉ ऑफ सोसायटी या इमारती बाबत पत्रकारांना सविस्तर माहिती द्यावी. ज्यामुळे इमारत वैध की अवैध हे उघड होणार आहे. तर ओमी कलानी यांच्या अटक झाल्यास जामीन न घेण्याच्या भूमिकेने पोलीसही धर्मसंकटात सापडले आहेत.