ठाणे : कळव्यात शनिवारी घेण्यात येणा:या लसीकरणाचे बॅनर राष्ट्रवादीकडून लावण्यात आले होते. परंतु रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी ते बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत थेट टीव्ट करुन पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली नाही तर पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. दुसरीकडे याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी या लसीकरणावरुन थेट शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टिका केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.
कळव्यात शनिवारी मोफत लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तयनुसार या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन आव्हाड यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले होते. त्यानंतर तशा आशयाचे बॅनर देखील कळव्याच्या विविध भागात लावण्यात आले होते. परंतु रात्रीच्या सुमारास येथील बॅनर अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फाडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आव्हाड यांनी टिव्ट करुन अशा गुंड प्रवृत्तींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील दिला आहे. दुसरीकडे याच मुद्याला धरुन राष्ट्रवादीचे ठाणो शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पुढील २४ तासात पोलिसांनी अटक करावी अन्यथा कळवा पोलीस ठाण्याला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी दिला. आहे. तसेच लसीकरण मोहीम ही महापालिकेची असतांना शिवसेनेकडून लसीकरण मोहीमेच्या ठिकाणी बॅनर कसे लावण्यात आले असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच लसीकरण बनविण्याचे तंत्रज्ञान शिवसेनेने आत्मसात केले आहे का? असा सवाल त्यांनी शिवसेना आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केला आहे.
महाराष्ट्र शासन महाविकास आघाडीकडून लसींचा साठा महापालिकेला दिला जात आहे. त्यानंतर महापालिकेकडून लसीकरण मोहीम आयोजित केली जाते. त्यामुळे याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे, केवळ शिवसेनेला नाही, त्यामुळे याची जाणीव खासदारांनी ठेवावी याची आठवण देखील त्यांनी करुन दिली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात लसीकरणाची मोहीम घेतली जाते, त्यावेळेस पालिकेचे बॅनर लागणो अपेक्षित आहे. परंतु कळव्यात जे लसीकरण सुरु आहे, तेथे शिवसेना नेत्यांचे फोटे लावून हे लसीकरण शिवसेना करते आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे शिवसेनेत जाणार आहेत, का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करीत पालिकेवर टिका केली.