ठाणे - ठाण्यातील थीम पार्क व बॉलिवूड पार्कच्या चौकशीसाठी समिती नेमली असतांना आता चौकशी सुरु होण्यापूर्वीच या समितीवर आक्षेप घेत भाजपाचे गटनेते नारायण पवार, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या समितीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेचे सेवा निवृत्त अधिकारी गिरीश मेहंदळे यांनीसुध्दा या समितीत काम करण्यासाठी नकार देणारे पत्र पालिकेला दिला आहे. त्यामुळे ही समितीच आता अर्धवट स्थितीत आली असून चौकशीचा केवळ फार्स होणार की काय अशी चर्चा मात्र या निमित्ताने सुरु झाली आहे. मागील काही दिवसापासून बॉलीवुड आणि थीम पार्कच्या मुद्यावरुन ठाणे शहर चांगलेच चर्चेत आले आहे. परंतु आयुक्तांनी चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या ठेकेदाराची भेट घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शिवसेनेची नेतेमंडळी या ठेकेदाराची भेट घेत असल्याचे प्रकरण समोर आणले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तर भाजपाने सुध्दा सत्ताधारी आणि प्रशासनावर याच मुद्यावरुन आगपाखड केली आहे. अशा प्रकारे सत्ताधारी आणि प्रशासन त्या ठेकेदाराबरोबर भेटीगाठी घेत असतील तर या प्रकरणाची पारदर्शक चौकशी कशी होणार असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराला भेटण्याच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या प्रकरणाच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराची भेट घेणार असेल तर चौकशी काय होणार असा प्रमुख आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच आम्ही टेक्नीकल पर्सन नसल्याने या चौकशी समितीत राहून काय करणार असा मुद्दा उपस्थित करीत या दोघांनी समितीमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही टेक्नीलक पर्सन नाही, त्यात सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराची भेट घेत असतील तर चौकशी काय होणार, त्यामुळेच मी समितीमधून बाहेर पडत आहे.(नारायण पवार - गटनेते - भाजपा)
त्या चौकशी समितीधून भाजपासह राष्ट्रवादीही पडणार बाहेर, थीम पार्कचे प्रकरण आले वेगळ्या वळणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 3:04 PM
चौकशी समितीच्या माध्यमातून थीम पार्क प्रकरणाची चौकशी सुरु होण्यापूर्वीच या समितीमधून विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या गटनेत्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देप्रशासनाची भुमिका संशयास्पदभाजपा आणि राष्ट्रवादीने दिले टेक्नीकल पर्सन नसल्याचे कारण