शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

कचराकरावरून राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांना घेरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 5:25 AM

विरोधी पक्षनेत्यांची लक्षवेधी : सोमवारच्या महासभेत चर्चा

ठाणे : सोमवारच्या महासभेत कचºयाच्या प्रश्नावरून ठामपाची महासभा चांगलीच गाजणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. ओलासुका कचरा वर्गीकरण तसेच उपविधीनुसार वाढवण्यात आलेले दर रद्द करावेत, अशी लक्षवेधी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी मांडली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा प्रशासनाच्या मदतीने सोसायट्यांवर कचराकर लादण्याचा प्रयत्न चांगलाच अडचणीत आणणार आहे.

एकीकडे ठाणे महानगरपालिकाच ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करत नसताना नागरिकांवर कराचा बोजा टाकून त्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. प्रशासनाने महसूलवाढीसाठी कचरासेवा शुल्क हा अतिरिक्त कर लावण्याचा ठराव २१ सप्टेंबर २०१८ रोजी पारित केला आहे. विशेष म्हणजे, ठाणे पालिकेकडेच ओला व सुका कचºयाच्या उपाययोजनांसंदर्भात ठोस उपाययोजना नसतानाही हा कर लादण्यात येत असल्याने ही करप्रणाली रद्द करावी, अशी मागणी करून त्यांनी ही लक्षवेधी मांडली आहे.केंद्रीय पर्यावरण, वने आणि जल-वायू परिवर्तन विभागाने काढलेल्या अधिसूचनेचा आधार घेऊन ठाणे महानगरपालिकेने सदरचा ठराव मंजूर केला आहे. तो मंजूर करताना शासकीय, अशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालये, रु ग्णालये, सार्वजनिक उपक्र म, कंपनी, हॉटेल्स आणि धार्मिक स्थळे, बाजारपेठा अशा ज्यांच्याकडे १०० किलो कचरा दिवसागणिक निर्माण होत आहे, त्यांनी स्वत:च्या कचºयाचे ओलासुका आणि घातक कचरा, असे वर्गीकरण करून ओला व सुका कचºयाची विल्हेवाट स्वत: लावून घातक कचरा पालिकेच्या ताब्यात देण्याचे बंधनकारक केले.यासंदर्भात जूनमध्येच नोटिसा ठाणे शहरातील गृहनिर्माण संस्थांसह सर्व वाणिज्य संस्थांना बजावल्या आहेत. त्यास ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. आता ती संपली आहे. पालिकेने या नोटीसमध्ये ओलासुका कचरा स्वीकारणार नसल्याचे नमूद करून नियमांची अंमलबजावणी न करणाºयांवर कारवाईचे निर्देशित केले होते. एकीकडे ठामपाकडेच ओलासुका कचरा स्वतंत्रपणे प्रक्रि या करण्याची यंत्रणा नाही. त्यामुळेच नागरिकांकडून स्वीकारलेला ओला आणि सुका कचरा घंटागाड्यांमध्ये एकत्र करून तो सीपी तलाव येथून दिवा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. त्यासाठी दरआकारणी करून ठाणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे.गृहनिर्माण संकुलांच्या नोटिसा मागे घ्यापूर्वी डायघर येथील डम्पिंगचा प्रस्तावही रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत ठाणे पालिका ओला व सुका कचºयाबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून ठाणे शहरातील गृहनिर्माण संकुले आणि इतर संस्थांना बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात तसेच वाढीव दरही रद्द करावेत,अशी मागणी त्यांनी या लक्षवेधीद्वारे केली आहे.जिझियाकराला विरोध करणार : शहरातील अस्वच्छता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणाव्यात. त्यांना तशी जाणीव व्हावी, यासाठी कराच्या रूपाने दंड वसूल केला जातो. कचरा करण्यापूर्वी करआकारणीचा विचार नागरिक करतील आणि शहरातील कचरा कमी होईल, असे महापालिका प्रशासनाला वाटते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहिल्यास शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत चांगली जागृती आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस