मुंब्रा : काही महिन्यांपासून पेट्रोल- डिझेल तसेच गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. याच्या निषेधार्थ सोमवारी मुंब्र्यातील तलाठी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी आंदोलक महिलांनी चूल पेटवून त्यावर चपात्या भाजल्या.
यावेळी बेचारी जनता करे पुकार लुट रही है, मोदी सरकार., कोरोनाने वाचलो, पण महागाईने मेलो. नहीं चाहिए हमे अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन अशा घोषणा देण्यात आल्या.
केंद्रात सत्ता परिवर्तन होऊन सात वर्षाहून अधिक काळ झाला आहे.या कालावधीत शेतात राबणारा शेतकरी ते शहरातील नागरिक सर्वजण महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे हे निषेध आंदोलन केले. कोरोना काळात अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. बाजारपेठा ठप्प आहेत, या सर्व बाजूंचा विचार करून इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी मर्जिया यांनी केली. ती मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षा सीमा बडदे, तमन्ना अशरफी, समिरा सय्यद आदी उपस्थित होते.