शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यात बैलगाडी आंदोलन; महिलांकडून चुलीवर स्वयंपाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 3:37 PM

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.

ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली असून शहरात बैलगाडी आंदोलन छेडत महिलांनी शासकीय विश्रामगृहाजवळ चुली पेटवून त्यावर स्वयंपाक केला. तर तरुणांनी सायकल चालवून केंद्रीतील मोदी सरकारचा निषेध केला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सचिव सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांच्या बाहेर शासकीय विश्रामगृहाजवळ हे अनोखे आंदोलन शनिवारी पार पडले.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.यामुळे या दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणार्‍या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही प्रचंड वाढलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी 'मोदी फेकतो डोळ्यात धूळ - रिकामे सिलिंडर पेटते चूल'; 'तेल का खेल - मोदी सरकार फेल';  भाजप की नियत झुटी है - महंगाई फिर से लौटी है' ; 'सिलिंडर हुआ 800 पार - कहाँ हो मोदी सरकार'; 'हर रोज किंमत बढाओगे - अच्छे दिन कब लाओगे';  वाह रे मोदी तेरा खेल - महंगा डिझेल- महँगा तेल; मोदी सरकार मुर्दाबाद आदी घोषणा देऊन केद्र शासनाच्या कारभाराचा पाढाच वाचला. 

महिलांनी यावेळी चूल पेटवून भाकर्‍या भाजल्या. काही कार्यकर्त्यांनी मोदींचे मुखवटे घालून रिकामा सिलिंडर उचलून तर शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बैलगाडी हाकून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी  परांजपे म्हणाले की, गेल्या महिनाभरात 790 रुपये असणारा सिलिंडर 834.50 रुपये एवढा महाग झाला आहे. याचा महिलांनी निषेध चूल पेटवून केला आहे. ठाण्यात सध्या पेट्रोलचा दर 105 रुपये झाला आहे. त्यामुळे युवक आणि युवतींनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला आहे. तर, आता बैलगाडी  कार पेक्षा बैलगाड्याच चालवाव्या लागतील, असा संदेश देऊन आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी कृतीतून मोदी सरकारचा निषेध केला आहे. 

मोदी सरकार हे सामान्यांना लुटण्यासाठी आहे. एकीकडे कोरोनाची महामारी असताना, बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळेच आम्ही मोदी सरकारचा निषेध करीत आहोत. जनतेच्या मनातील रोष ओळखून आता तरी मोदी सरकारने इंधनाच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. जर इंधनाचे दर कमी केले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही परांजपे यांनी दिला. या आंदोलनात महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, यांच्यासह सुरेखा पाटील, प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे