पालघर : महागाईत केवळ महिलाच नाही तर शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक भरडले जात असून जीवनावश्यक वस्तूंची साठमारी करणारे व्यापारी भाजपा-सेनेचे दलाल असल्याचा आरोप केला. निवडणुकीत संपवलेले पैसे या साठमारीच्या व्यवहारातून वसुली केली जात असल्याचे सांगून पालघर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून पालघर तहसीलदार कार्यालयावर शुक्रवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सत्तेवर येऊन भाजपा-सेना युती सरकारला एक वर्षाचा कालावधी लोटला असूनही जीवनावश्यक वस्तूंमधील डाळी, कडधान्ये, भाजीपाला, खाद्यतेल यांच्या किमतींत बेसुमार वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसांत भाव कमी होणे गरजेचे असताना सर्वसामान्यांना दिलासा देण्याची पावले राज्य शासनाकडून उचलली जात नसल्याचे राष्ट्रवादीने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी सांगून पंतप्रधान हे देशात कमी तर परदेशातच जास्त फिरत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी त्यांना काही देणेघेणे नसल्याची टीका त्यांनी केली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दामोदर पाटील, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष नीलम राऊत, अशोक अंबुरे, नगरसेवक प्रीतम राऊत, फरिद लुलानिया, सचिन पाटील, अस्लम मणियार, मकरंद पाटील इ.नी भाजपा-सेना सरकारविरोधात घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला. या वेळी पालघर रेल्वे स्टेशनकडून निघालेला मोर्चा पालघर तहसीलदार कार्यालयाकडे आल्यानंतर तहसीलदार चंद्रसेन पवारांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)१वर्षपूर्तीनंतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने जव्हारमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस सरकारच्या विरुद्ध वर्ष होऊनही शेकडो समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे यशवंतनगर टॉवरपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून निदर्शने केली. या वेळी पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, तालुकाध्यक्ष कमळाकर धूम, जिल्हा चिटणीस बळवंत गावित, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष शोएब लुलानिया, जिल्हा सरचिटणीस मनोहर भानुशाली, नगरसेवक संजय वांगड, मनीषा वाणी, दीपक कांगणे, हबीब शेख तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.२गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याबरोबर दुष्काळाच्या संकटावरही मात करण्यात तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत सरकारने कोणतीहीठोस पावले उचलली नाहीत. नागरिकांच्या रोजच्या जगण्याला जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आकाशाला भिडली असून त्यांचे अंदाजपत्रक पूर्णत: मोडून पडले आहे, अशा विविध समस्यांचा पाढा वाचण्यात आला. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शनिवारी वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. खंडेश्वरी नाका येथून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर, तहसीलदारांना निवेदन देण्यात येईल, असे तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी सांगितले.
युतीविरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल
By admin | Published: October 30, 2015 11:42 PM