मुंब्रा : वीजचोरांवर कारवाई करू नये, यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे मुंब्य्रातील एक ज्येष्ठ नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांवर वारंवार दबाव टाकून वीजचोरांना अप्रत्यक्षपणे अभय देत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट महावितरणच्या एका अधिका-याने केला आहे.इतर काही शहरांप्रमाणेच मुंब्य्रातील वीज वितरणचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. त्यासाठी निविदादेखील काढण्यात आली आहे. खाजगीकरणामुळे वीजग्राहकांना विजेसाठी कथित जादा पैसे मोजावे लागतील. ते होऊ नये, यासाठी महावितरणच्या मुंब्रा कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांनी थकबाकी वसुली तसेच वीजचोरांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत बुधवारी येथील सम्राटनगर परिसरातील वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चोरीची वीज वापरून पाणी खेचण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार जप्त केली होती. ती परत दिली नाही, म्हणून आनंद कोळीवाडा येथील मातृ आशीष इमारतीमध्ये असलेल्या महावितरणच्या कार्यालयात घुसून दोघा भावांनी सहायक अभियंत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. याबाबतची तक्र ार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या अधिकाºयांनी मारहाण केलेल्यांच्या विरोधात तक्र ार करू नये, यासाठी एका नगरसेवकाने पोलीस ठाण्यासमोर अधिकाºयांवर दबाव टाकला. तसेच तक्र ार मागे घेतली नाही, तर नगरसेवकपदाचा तत्काळ राजीनामा देण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. सदर नगरसेवकाने यापूर्वीदेखील अमृतनगर परिसरात महावितरणच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती महावितरणच्या शीळ विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी यांनी लोकमतला दिली.
वीजचोरांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे अभय? महावितरण अधिका-याचा गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:54 AM