शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

कळवा-मुंब्य्रात राहणार राष्ट्रवादीचा वरचष्मा

By admin | Published: January 09, 2017 6:46 AM

ठाणे शहरातील विधानसभा मतदारसंघात जरी शिवसेना-भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार असली, तरी कळवा, मुंब्रा या मतदारसंघात

अजित मांडके / ठाणेठाणे शहरातील विधानसभा मतदारसंघात जरी शिवसेना-भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार असली, तरी कळवा, मुंब्रा या मतदारसंघात गेली १० वर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व टिकून आहे. मुंब्य्रात दोन्ही काँग्रसची ताकद समसमान असली, तरी गेल्या काही महिन्यात बदलेल्या राजकीय गणितांचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात आघाडी आणि कळवा-मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. या भागात राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे वर्चस्व कमी आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच सरस ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने कळव्याकडे थोडया प्रमाणात लक्ष केंद्रीत केल. पण मुंब्य्रावर फारसे लक्ष दिलेले नाही. एमआयएम आणि सपा या ठिकाणी मतांची विभागणी करेल. त्याचा फायदा आपल्याला उठवता येईल अशी त्यांची अटकळ आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ म्हणजे माजी मंत्री आणि ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला. मागील निवडणुकीत अनेक समीकरणे त्यांच्याविरोधात होती. सत्ताधाऱ्यांनी सपासह, एमआयएम आणि येथे अपक्ष रिंगणात उतरवून आव्हाडांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे ठरविले. परंतु त्यांनी या सर्वांना सुरुंग लावला. देशासह राज्यात भाजपाचे वारे वाहत असतांनादेखील कळवा, मुंब्रा मतदारसंघावर राष्ट्रवादीने वरचष्मा कायम ठेवला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८५ हजार ४०७ मते मिळाली, तर शिवसेनेचे दशरथ पाटील यांना ३८ हजार ४१२ मते मिळाली. मनसेच्या महेश साळवी यांना केवळ २ हजार ७८३, भाजपचे अशोक भोईर यांना १२ हजार २३१, एमआयएमचे अश्रफ मुलानी यांना १४ हजार ७१२, कॉंग्रेसचे यासीम कुरेशी यांना ३ हजार ७१७ मते मिळाली. खरी लढत जितेंद्र आव्हाड विरूद्ध पाच पक्ष अशी होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. पण आव्हाड ४७ हजार ४८ मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना अपक्ष लढण्याच्या तयारीत असली तरी त्यांची येथे फारशी डाळ शिजेल, असे काही वाटत नाही. भाजपासुद्धा कळव्यावर लक्ष देऊन आहे. मुंब्य्राकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही. एमआयएम आणि सपादेखील नशीब आजमावणार असल्याने मतांच्या टक्केवारीत काहीसा फरक पडू शकतो. एकूणच कळवा-मुुंब्य्रात सध्या तरी राष्ट्रवादी सरस असल्याची स्थिती आहे. नव्या कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने बालेकिल्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेसला धक्का देत राष्ट्रवादीने राजन किणे यांच्यासह अनेकांना राष्ट्रवादीत खेचून आणल्याने येथील गणिते राष्ट्रवादीच्या बाजुने झुकल्याचे चित्र आहे.