ठाणे : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. आकाश ढगाळलेले आणि हवेत मोठ्या प्रमाणात गारवा वाढला आहे. गेल्या २४ तासांत ५७.८० मिमी पाऊस पडला. यादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही. तर, पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आतापर्यंत ४५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अॅलर्टच्या पार्श्वभूूमीवर पुण्याहून २५ जणांचे एनडीआरएफचे एक पथक ठाण्यात दाखल झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली आहे. तर, धरण क्षेत्रातही पावसाला जोर नसल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास विलंब लागत आहे. ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी, इमारती कोसळण्यासारख्या दुर्घटना घडल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याच्या अनुषंगाने ठाणे ृपालिकेच्या अग्निशमन दल यांच्यासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तसेच एनडीआरएफची तुकडी सुसज्ज ठेवली आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी ठाणे शहरात २६.५० मिमी, कल्याणला २ मिमी, मुरबाड १, उल्हासनगर १६, अंबरनाथ ३.३० मिमी, भिवंडी ६ आणि शहापूरला ३ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडला.पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊ सपालघर जिल्ह्यात बराचसा भाग बुधवारी कोरडाच राहिला. वसई तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या ठिकाणी १७ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. डहाणू तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत मुसळधार पाऊ स होता. त्यानंतर उघडीप दिली. तर जव्हार तालुक्यांत सकाळी तुरळक सरींनी हजेरी लावली. दुपारनंतर काहीसा जोर वाढला.
ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात, हवामान खात्याचा रेड अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 3:22 AM