अंबरनाथ - अंबरनाथ रेल्वे स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता पूर्व भागातील प्रवाशामना स्थानकाबाहेर पडण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. मात्र पश्चिम भागातील प्रवाशामना कर्जत दिशेकडील एकमेव पुलाचाव वापर करावा लागत आहे. त्यामुळे पश्चिम भागात बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गासह स्टेशनला जोडणा-या नव्या रस्त्याचा विचार सुरु आहे. या संदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिकेच्या विकास आराखडय़ातील रस्त्यांची माहिती घेत पर्यायी रस्त्याच्या कामासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना अधिका-यांना दिले आहे.
खासदार आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. शिंदे हे अंबरनाथमध्ये आले होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या स्वत: जाणून घेतल्या. त्यातील महत्वाच्या समस्यांवर लागलीच तोडगा काढण्याचे आदेश देखील दिले आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतांना काही नागरिकांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकातुन बाहेर पडणा-या मार्गासंदर्भात आणि फेरीवाल्यांसदर्भात महत्वाच्या सुचना खासदारांकडे केले. त्या सुचनांसंदर्भात अधिका-यांसोबत बसुन महत्वाचे निर्णय घेण्यावर चर्चा झाली. त्यातील महत्वाची सुचना म्हणजे पश्चिम भागातील रेल्वे प्रवाशामना स्थानकातुन बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. तर पूर्व भागातील प्रवाशांसाठी दोन पादचारी पुलासह फलाट क्रमांक 3 वर एक पायवाट देखील आहे. त्यामुळे पूर्व भागातील गर्दी ही सजर स्थानकाबाहेर पडते. मात्र पश्चिम भागातील प्रवाशांना कर्जत दिशेकडील एकमेव पुलावरच अवलंबुन रहावे लागत आहे. यावर तोडगा कसा काढता येईल यावर खासदारांनी पालिकेच्या अधिका-यांसोबत चर्चा केली. त्या चर्चेत पश्चिम भागाला लागुनच अंबरनाथ आयुध निर्माणी कारखाण्याची जागा असुन त्याच जागेत पालिकेचे तीन आरक्षण देखील आहेत. त्यात विकास आराखडय़ातील 12 मिटरचा रस्ता देखील अंतभरुत आहे. या रस्ता तयार झाल्यास पश्चिम भागातील नागरिकांना स्थानकात येण्यासाठी दोन मार्ग तयार होतील. हा रस्ता रेल्वे स्थानकातुन थेट तहसिलदार कार्यालय आणि मटका चौक यांच्या मध्यभागी येणार आहे. हा रस्ता विकसीत करण्यासाठी आयुध निर्माण कारखाण्यासोबत स्वत: चर्चा करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले. हा रस्ता तयार झाल्यास पश्चिम भागातील रेल्वे स्थानकाकडे येताना होणारी वाहतुक कोंडी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
या रस्त्यासंदर्भात या आधी मुख्याधिकारी गणोश देशमुख यांनी आयुध निर्माण कारखाण्याकडे पाठपुरावा देखील केला आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी आणि रस्त्यातील जागेचा अडथळा सोडविण्यासाठी आयुध निर्माण कारखाण्याच्या अधिका-यांसह संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सोबत अंबरनाथ स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना हटविण्यासाठी रात्रीच्या वेळी पालिकेचे कर्मचारी ठेवण्याच्या सुचना देखील त्यांनी दिले आहेत.