---------------------------------------------------
श्रवण यंत्रांचे वाटप
डोंबिवली : इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे उल्हासनगरच्या पालवी कर्णबधिर शाळेतील अत्यंत गरजू व गरीब सात विद्यार्थ्यांना १४ श्रवण यंत्रे मोफत देण्यात आली. तसेच ‘स्वामींचे घर’ या संस्थेतर्फे रोज गरीब, गरजू व भुकेल्यांना अन्नदानाची पाकिटे देण्यात येतात. या त्यांच्या सेवा कार्यास सहकार्य म्हणून इनरव्हीलतर्फे मूग, मटकी, चहा, डाळी, साखर, पोहे, साबुदाणा, रवा, गूळ असे १२० किलो धान्य दान देण्यात आले.
--------------------------------------------------
क्षयरोग दिन साजरा
कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त बुधवारी केडीएमसीमध्ये जागतिक क्षयरोग दिन बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय, नेतीवली दवाखाना, मोहना, मढवी या आरोग्यकेंद्रांत साजरा करण्यात आला. सर्व टीबी रुग्णांचे क्षयरोगासंदर्भात समूपदेशन करून त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. क्षयरोग बरा होण्यासाठी औषधोपचाराबरोबरच रुग्णांना पोषक आहाराचीदेखील नितांत गरज असते, त्यानिमित्त येथील जन स्वराज्य सेवा संस्था फाउंडेशनने कल्याण येथे ३० गरजू एमडीआर क्षयरुग्णांना पोषक आहाराचे वितरण केले.
-----------------------------------------------------