शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

एमआरटीपी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची

By admin | Published: November 16, 2015 2:08 AM

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या महिनाभरात अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या महिनाभरात अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अशा बांधकामांचा वेग मंदावला आहे. गेल्या सहा वर्षांत हे प्रथमच घडत आहे. अशा बांधकामांना राजकीय मंडळीचे संरक्षण मिळत गेल्यामुळे प्रभावी कारवाई होत नव्हती. वास्तविक, या मोहिमेसमवेत आयुक्तांनी कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवक तसेच राजकारणी मंडळींवर कारवाईचा बडगा उगारायला हवा, तरच अशा गैरप्रकाराला आळा बसू शकेल.ही बांधकामे तोडताना वीज व पाणी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना नियमानुसार या जोडण्या घेण्यासाठी संबंधित विभागामध्ये अनेक खेटे मारावे लागत असतात. परंतु, अशी बांधकामे करणाऱ्या समाजकंटकांना या सुविधा सहजरीत्या उपलब्ध होतात. यामागे फार मोठे अर्थकारण आहे. समाजकंटक, अधिकारी व राजकारणी अशी जी साखळी तयार झाली आहे, ती तोडण्यासाठी प्रशासनाने क्षेत्र एमआरटीपी कायद्याची प्रभावीरीत्या अंमलबजावणी केली पाहिजे. जोवर या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होत नाही, तोवर हे गैरप्रकार थांबणे कठीण आहे.अनधिकृत बांधकामे करणाऱ्या चार ते पाच चाळमाफियांवर या कायद्यांतर्गत कारवाई झाली तरच ही मंडळी पुन्हा भविष्यात धाडस करणार नाहीत. ही बांधकामे जमीनदोस्त झालीच पाहिजे. परंतु, त्याचबरोबर कायद्याचा बडगा काय असतो, हे या चाळमाफियांना कळायला हवे. वन, शासकीय व गोरगरीब आदिवासी समाजाच्या जमिनी हडप करणारे हे चाळमाफिया मोकाट सुटणे, हे न्यायाला धरून होणार नाही. त्यांच्यासमवेत वीज व पाणी देणाऱ्या महावितरण व मनपाच्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. तरच, खऱ्या अर्थाने करदात्यांना न्याय मिळू शकेल. प्रामाणिकपणे कर भरूनही करदात्याला पाण्यापासून वंचित राहावे लागते. औद्योगिक क्षेत्रातही अनेक उद्योजकांनी बेकायदेशीररीत्या नळजोडण्या घेतल्या आहेत. या सर्व गैरप्रकारामागे स्थानिक नगरसेवकांचा हात आहे. मनपा प्रशासनाने या नळजोडण्या त्वरित खंडित करणे गरजेचे आहे. नागरी वसाहतीला दोन ते तीन दिवस पाणी मिळत नाही. तर, दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रामध्ये अनधिकृत नळजोडण्यांचा सुळसुळाट हे चित्र बदलण्यासाठी मनपाने खंबीर धोरण आखले पाहिजे.