सुरेश लोखंडेठाणे : मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांचे जीवन मोठ्या धकाधकीचे, ताणतणावाचे, धावपळीचे आहे. यातूनही त्यांना मन:शांती लाभावी, यासाठी ‘सहज साधना’ या साध्या, सरळ आणि सोप्या ध्यान साधनेची गरज असल्याचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदी) यांनी शुक्रवारी सांगितले.मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवी शंकर यांचे ‘गुरुदेव’ आत्मचरित्र भानुदीदींनी लिहिले आहे. याशिवाय, ‘गॉड अॅण्ड गॉडेस’ हे देवीदेवतांचे माहात्म्य स्पष्ट करणारा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. यानंतर, त्या लवकरच ‘अष्टलक्ष्मी’ या नावाचे पुस्तक प्रकाशन करण्याच्या तयारीत आहेत. यासारख्या दुर्मीळ पुस्तकांच्या लिखाणासह देशात व परदेशात ‘ध्यान साधना’चे विविध कार्यक्रम घेण्यासाठी मिळणारी ऊर्जा बंधू श्री श्री रवी शंकर यांच्याकडून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोशल मीडियात वाढत जाणा-या विकृततेवर उपाययोजना विचारली असता त्या म्हणाल्या की विश्वात चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत. यापैकी कोणाकडे आकर्षित व्हायला पाहिजे हे ठरवणे गरजेचे आहे. ‘ध्यान’ साधनेच्या एकाग्रतेने वाईट विचारांचा नायनाट होऊन व्यक्तीला सकारात्मक व मनशांतीच्या लाभ मिळत असल्याचे वास्तव त्यांनी लक्षात आणून दिले. भानूदिदींच्या भारतभर ६१८ शाळा आहेत. त्यामध्ये ६७ हजार मुले मोफत शिक्षण घेत आहेत. याप्रमाणेच महाराष्ट्रात ठाण्यासह ठिकठिकाणी नऊ शाळा कार्यरत असून त्यातही दोन हजार मुलांचे मोफत शिक्षण दिदींकडून दिले जात आहे.........राम मंदिर बांधण्याची गरजसध्या राम मंदिर बांधण्यासाठी देशात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर भानूदिदींना विचारणा केली असता त्यांनी पटकन राम मंदिरची गरज असल्याचे भावनिक उद्गार काढून अध्योद्यात बांधण्यात येणाºया मंदिरास पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर सध्याच्या केंद्रातील सरकारविषयी बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्यावर बोलणे त्यांनी टाळले.
नागरिकांच्या दैनंदिन तणावमृक्तीसाठी ‘सहज साधना’ ध्याय साधनेची गरज
By सुरेश लोखंडे | Published: January 04, 2019 8:39 PM
मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठळक मुद्देकेवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदी