लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे कोरोना मुळे निधन झाल्याने या रिक्त गटनेते पदी शिवसेना नगरसेविका नीलम ढवण यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
शिवसेनेचे पालिकेतील गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे ९ जून रोजी कोरोना मुळे निधन झाले होते . दुसऱ्या दिवशी १० ऑगस्ट रोजी आमगावकर यांच्या वाढदिवशी त्यांच्या आईचा देखील कोरोना मुळे मृत्यू झाला होता . या घटनेने शहरात हळहळ व्यक्त झाली होती .
त्या पासून जवळपास गेले दोन महिने गटनेते पद हे रिक्तच होते . महापालिकेची महासभा येत्या 13 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली गेली आहे. अंदाजपत्रकास मंजुरी साठीची हि सभा असून नव्या गटनेत्याची नियुक्ती करणे गरजेचे होते . त्या अनुषंगाने शिवसेनेच्या पालिकेतील गटनेते पदी नीलम ढवण यांची नियुक्ती केली गेली आहे . या आधी देखील पालिकेत ढवण यांनी गटनेते पदाची जबाबदारी सांभाळली होती . त्या भाईंदर पूर्व भागातून नगरसेविका असून महिला आघाडीच्या शहर प्रमुख आहेत.