शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नेपाळच्या गायिकेचा साडेसहा कोटींना गंडा; किडनी विकून पैशांचे दाखवायचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:25 AM

गायिकेने देशभरातून फसवणूक करून साडेसहा कोटी रुपये अवैध मार्गाने गोळा केल्याचे उघड झाले

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथच्या महिलेला किडनीच्या मोबदल्यात चार कोटी देण्याचे आमिष दाखवणाऱ्या नेपाळच्या गायिकेने देशभरात अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. या गायिकेने देशभरातून फसवणूक करून साडेसहा कोटी रुपये अवैध मार्गाने गोळा केल्याचे उघड झाले. या गायिकेच्या साथीदाराच्या  बँक स्टेटमेंटवरून ही बाब उघड झाली असून पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अंबरनाथच्या रहिवासी कल्पना मगर यांची नेपाळची गायिका रबिना बाबी यांनी तब्बल आठ लाखांची फसवणूक केली. रबिना यांनी मगर यांची किडनी चार कोटी रुपयाला विकण्याचे आश्वासन दिले होते. आपल्याला चार कोटी रुपये मिळणार या आशेने मगर भूलथापांना बळी पडल्या. नोंदणी आणि इतर कामकाजासाठी रबिना यांनी मगर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने आठ लाख रुपये वसूल केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मगर यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने थेट दिल्ली गाठत रबिना यांचा शोध घेतला. एवढेच नव्हे तर रबिना यांनी ज्या बँक खात्यात पैसे जमा करायला सांगितले होते तो बँक खातेधारक आणि रबिना यांचा साथीदार अरविंद कुमार याची माहिती काढली. त्यांच्या बँक खात्यात  देशभरातून साडेसहा कोटी रुपये जमा झाल्याचे उघड झाले. देशभरात फसवणूक झालेल्या अनेकांनी याच बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. एवढी मोठी गंभीर बाब उघड झाल्यानंतरही अंबरनाथच्या पोलिसांनी या मुख्य आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. या आरोपींना मोकाट सोडण्यात आल्याने देशात पुन्हा अनेकांची फसवणूक होण्याचा धोका  आहे.आरोपी पसार होण्याची शक्यतापैसे लुबाडणारी महिला आणि तिचा साथीदार हे दिल्लीच्या शालीमार बाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत आहेत. या आरोपींचा शोध खुद्द फिर्यादी आणि त्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याने घेतला. मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाही.शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केल्यास देशभरातील इतर नागरिकांची झालेली फसवणूक  लक्षात येऊ शकते. मात्र आरोपीला अटक करण्यास विलंब होत असल्याने हे आरोपी दिल्लीतून पसार होण्याची शक्यता आहे.दिल्लीच्या शालीमार बाग पोलिसांनी संबंधित फसवणूक करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून लेखी स्वरूपात पैसे परत देण्याचे हमीपत्र घेतले होते. मात्र तरीदेखील अंबरनाथच्या महिलेला तिचे पैसे परत मिळाले नाहीत.